मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  काय? ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घेणार प्रेक्षकांचा निरोप?
महाराष्ट्राची हास्यजत्रा
महाराष्ट्राची हास्यजत्रा (HT)
21 May 2022, 6:24 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
21 May 2022, 6:24 AM IST
  • सध्या मालिकेशी संबंधीत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टवरुन हा शो बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे. जाणून घेऊया सत्य काय आहे...

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्य जत्रा.' या कार्यक्रमातील कलाकारांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. अशातच आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोनी मराठी वाहिनीचे कंटेट हेड अमित फाळके यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अमित फाळके यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते सई ताम्हणकरसोबत दिसत आहेत. हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. या फोटोमध्ये दोघांमध्ये काही तरी गंभीर संवाद सुरु असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी, 'सीझन रॅप सून' असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे हास्य जत्रेचे हे पर्व लवकरच संपणार असल्याचे म्हटले जात आहे.

अमित यांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी त्यावर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. ‘नाही’, ‘असे करु नका’, ‘असे करु नका सर’, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. पण खरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार का? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अमित यांनी यापुढे केलेल्या पोस्टने अनेकांना त्यांची उत्तरे मिळाली आहेत.

या पाठोपाठ अमित फाळके यांनी आणखी एक नवी पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी प्राजक्ता माळीसोबतचा हसरा फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी ‘न्यू सीझन सून…’ म्हणजे ‘नवे पर्व लवकरच’ असे म्हटले आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग