Madhuri Dixit: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित निवडणूक रिंगणात? 'या' पक्षाकडून लढणार असल्याची चर्चा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madhuri Dixit: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित निवडणूक रिंगणात? 'या' पक्षाकडून लढणार असल्याची चर्चा

Madhuri Dixit: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित निवडणूक रिंगणात? 'या' पक्षाकडून लढणार असल्याची चर्चा

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Nov 16, 2023 11:05 AM IST

Madhuri Dixit in Election: माधुरी दीक्षितला लोकसभा निवडणुकीत तिकिट मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. ती मुंबईत निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Madhuri Dixit
Madhuri Dixit (Instagram )

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याने अनेकांच्या मनावर राज्य केले. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज माधुरी सर्वांची आवडती अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता माधुरी दीक्षित निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब आजमावणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ती रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

२३ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थळी झालेल्या चर्चेत माधुरीला लोकसभा निवडणुकीचे तिकिट देण्याच्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर माधुरी भाजपच्या तिकिटावर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वाचा: विकीशी लग्न करुन अंकिता लोखंडेला होतोय पश्चाताप ? सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

माधुरीचा मतदारसंघ कोणता?

मुंबईतील तीन मतदार संघ हे भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामधील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिला तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी पुण्यातील जागेसंदर्भातही माधुरीची चर्चा सुरु होती. सध्या खासदार गजानन किर्तिकर आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यामध्ये जोरदार वाद सुरु आहे. त्यावर पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले असून त्यांना यश मिळाले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार अमोल किर्तिकर यांच्याविरोधात ही जागा भाजपला मिळाल्यास तेथून माधुरीला तिकिट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Whats_app_banner