मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. काही दिवसांपूर्वी तिचा 'झिम्मा २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिचे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरले. आता शिवानी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओवरुन ती लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
शिवानीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडी खरेदी करत असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने “या आठवड्यात माझ्या आईला मी हा व्हिडीओ पाठवला. २०२४ मध्ये काहीतरी खास…” असे कॅप्शन दिले होते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.
वाचा: समांथा रुथ प्रभू करणार दुसरे लग्न? स्वत: अभिनेत्री दिली प्रतिक्रिया
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “तुम्ही दोघं लग्न करणार आहात का?”, “तुमचं लग्न आहे का?” अशा कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सध्या शिवानी-अजिंक्यच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
शिवानी ही गेल्या काही दिवसांपासून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेता अजिंक्य ननावरेला डेट करत आहे. त्यांची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं. २०१७ पासून शिवानी-अजिंक्य एकत्र असून लवकरच लवकरच लग्न करणार आहेत.
संबंधित बातम्या