बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग चाहत्यांना गूड न्यूज देणार आहेत. त्यांच्या घरी नव्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. दीपिका पदुकोण सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. आता दीपिकाला मुलगा होणार की मुलगी हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. खरं तर हा फोटो काही गिफ्टचा आहे. या फोटोवरुन दीपिका आणि रणवीरला मुलगा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
इन्स्टाग्रामवरील एका गिफ्टिंग पेजने काही फोटो शेअर केले आहेत. लवकरच आई होणाऱ्या दीपिका पदुकोणसाठी हे गिफ्ट्स आहेत. फोटो शेअर करणाऱ्या गिफ्टिंग पेजने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दीपिका पदुकोणची गिफ्ट ऑर्डर पॅक झाली आहे.' हे गिफ्ट असलेले बॉक्स निळ्या रंगाने सजवण्यात आले आहे. निळा रंग पाहून चाहते दीपिकाला मुलगा होणार असल्याचा अनुमान लावत आहेत. पण खरच दीपिकाला मुलगा होणार का याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दीपिका पदुकोणच्या या गिफ्ट पॅकची एक पोस्ट रेडिटवर ही व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टवर एका चाहत्याने लिहिले की, 'जर हे खरे असेल तर रणवीर आणि दीपिकाने घोषणा न करता करता ब्रँडाने अशा प्रकारे लिंग उघड करणे अत्यंत अनप्रोफेशनल आहे.' तर दुसऱ्या एका यूजरने 'भारतात जन्मापूर्वी बाळाचे लिंग जाणून घेणे बेकायदेशीर आहे. दीपिकाला माहीत असले तरी ती घोषणा करू शकत नाही' असे म्हणत ब्रँड कंपनीला सुनावले आहे. तर काही यूजर्सने दीपिकाला मुलगा होणार असल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
वाचा: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर सामंथा रुथ प्रभूने केली पहिली पोस्ट, म्हणाली...
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी २०१८ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाची तुफान चर्चा रंगली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२४मध्ये त्यांनी घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची माहिती दिली. ते ऐकून सर्वांना आनंद झाला. दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर दीपिका कल्की २८९८ एडी या चित्रपटात ती दिसली होती. गर्भवती असताना दीपिकाने संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास आणि कमल हासन हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.