बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या पतौडी पॅलेसमध्ये आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. पतौडी पॅलेसचे संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. आता यावर खुद्द सैफ अली खानने वक्तव्य केले आहे. चला जाणून घेऊया सैफ अली खान पतौडी पॅलेसविषयी काय म्हणाला?
सैफ अली खानने नुकताच 'इंडिया टूडे'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सैफला पतौडी पॅलेसचे रुपांतर संग्रहालयात करण्यात येणार आहे का? असा प्रश्न विचारण्याच आला होता. त्यावर त्याने या सर्व अफवा आहेत. तसेच हा राजवाडा त्याच्या खूप मनाजवळ आहे. कारण या राजवाड्यामध्ये सैफच्या वडिलांना दफन करण्यात आले आहे. याशिवाय हा पतौडी पॅलेस आपल्यासाठी खूप खास असल्याचेही त्यांनी सांगितले.
'हा पॅलेस त्याच्यासाठी खूप खास आहे कारण माझे आजी-आजोबा आणि वडिलांना येथे दफन करण्यात आले आहे' असे सैफ म्हणाला. राजवाड्यातील काही जुन्या भागांना दरबल हॉल असे म्हटले जात असले तरी सैफला वाटते की ते आता खूप जुने झाले आहे आणि आता त्याला लाँग रूम म्हटले पाहिजे. पतौडीचे सातवे नवाब खंडर यांनी आपल्या वडिलांसोबत मिळून हे घर बांधले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या क्रिकेटशी संबंधीत अनेक आठवणी आम्ही या पॅलेजमध्ये ठेवल्या आहेत.
यामुलाखतीमध्ये पुढे सैफने 'जेव्हा वडिलांनी पतौडी पॅलेस हा हॉटेलसाठी दिला होता तेव्हा आजीने असे करण्यास नकार दिल्याचे सांगितले. कारण त्या वस्तूशी आमचा इतिहास जोडला गेला होता आणि आम्हा सर्वांना त्याचा अभिमान आहे' असे सांगितले.
पतौडी हा महाल सैफ अली खानच्या आजोबांनी १०० वर्षांपूर्वी आजीसाठी बांधला होता. आजोबांच्या निधनानंतर सैफचे वडील मन्सूर अली खान यांनी हा राजवाडा पुन्हा नीमराणा हॉटेलला भाडे तत्त्वावर दिला होता. सैफ याच्याशी भावनिकरित्या जोडला गेल्याने त्याने हॉटेल कंपनीतून ते काढून घेतले. आज या पतौडी पॅलेसची किंमत ८०० कोटी रुपये आहे. या आलिशान पॅलेसमध्ये १०० रुम असल्याचे म्हटले जाते.
वाचा: रमेश सिप्पी यांनी 'शोले'चे दिग्दर्शन केलेले नाही; सचिन पिळगावकर यांचा चकीत करणारा खुलासा
सैफच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तो आता देवरा पार्ट 1 या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.