छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. जवळपास दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये बरेच बदल झालेले पाहायला मिळाले. शोचा सूत्रसंचालक म्हणून महेश मांजरेकर यांच्या ऐवजी थेट अभिनेता रितेश देशमुखची निवड करण्यात आली. आता हा शो ७० दिवसांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरु झाल्यापासूनच सर्वांची मने जिंकताना दिसत होता. कारण यावेळी केवळ कलाकाराच नाही तर सोशल मिडिया इन्फ्लूएंसर देखील घरात सहभागी झालेले दिसले. घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांनी पहिल्या दिवसापासूनच सर्वांचे लक्ष वेधले होते. बिग बॉस मराठीच्या ५व्या सिझने अक्षरश: टीआरपीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केल्याचे पाहायला मिळाले. पण १०० दिवस चालणारा हा शो आता अचानक बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे.
सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सिझन पाचची बरीच चर्चा सुरु आहे. घरात होणारे टास्क, स्पर्धकांचे मजेशीर वागणे, वाद-विवाद अशा बऱ्याच गोष्टींची कायम चर्चा सुरु असायची. आता बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले लवकरच होणार असल्याची चर्चा रंगली आहे. नेहमी बिग बॉस मराठी हा शो १०० दिवसांचा असतो. पण यावेळी हा शो ७० दिवसात बंद करणार असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत वाहिनीकडून कोणतीही अधिकृत माहिती आली नसली तरी सोशल मीडियावर काही इन्स्टाग्राम पेजने याविषयी पोस्ट शेअर केली आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात सध्या निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वर्षा उसगावकर, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, संग्राम हे कलाकार दिसत आहेत. या कलाकारांपैकी कोणाच्या हातात ट्रॉफी येणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: पाणगेंडा ओळखताना सूरजची झाली दमछाक, व्हिडीओ पाहून हसू होईल अनावर
बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच नॉमिनेश टास्क पार पडला. या टास्कमध्ये वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक नॉमिनेट झाले. आता भाऊच्या धक्क्यावर कोणता स्पर्धक बाहेर पडणार हे लवकरच कळेल.