मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aishwarya Pregnant: ऐश्वर्या देणार चाहत्यांना गुडन्यूज? प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण

Aishwarya Pregnant: ऐश्वर्या देणार चाहत्यांना गुडन्यूज? प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 19, 2024 03:04 PM IST

Aishwarya Sharma Pregnant: दोन वर्षांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने नील भट्टशी लग्न केले. आता ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ऐश्वर्या देणार चाहत्यांना गुडन्यूज? प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण
ऐश्वर्या देणार चाहत्यांना गुडन्यूज? प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण

Aishwarya Sharma Good News: गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस १७मधील स्पर्धक ऐश्वर्या शर्मा ही चर्चेत आहे. तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी समोर येत आहेत. ऐश्वर्यावे नील भट्टशी लग्न केले आहे. त्यांची जोडी ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. ऐश्वर्या आणि नीलला नेहमी एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. जेव्हा त्यांनी लग्न केले तेव्हा त्यांच्या विषयी चर्चा रंगल्या होत्या. आता ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ऐश्वर्या सध्या डान्स दिवाने या कार्यक्रमात दिसत आहे. या कार्यक्रमाच्या सेटवर एकदा ऐश्वर्या बेशुद्ध पडली होती. त्यानंतर शुद्धीवर आल्यावर तिने पोस्ट शेअर करत प्रकृतीविषयी माहिती दिली होती. आता ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ऐश्वर्या आणि नील लवकरच चाहत्यांना गुड न्यूज देतील असे म्हटले जात आहे.
वाचा: किली पॉलला ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर

ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट लवरकच आई-बाबा होणार आहेत. दोघांनी अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. ऐश्वर्या योग्य वेळेची वाट पाहात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच ऐश्वर्या-नील चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर करतील असे म्हटले जात आहे.
वाचा: अरिजीत सिंहला पाहून रिंकूने असे काही केले की नेटकरीही झाले चकीत

ऐश्वर्या सेटवरच पडलेली बेशुद्ध

ऐश्वर्या होळी स्पेशल शूट करत असताना सेटवरच बेशुद्ध पडली होती. त्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत होते. त्यामुळे शुद्धीवर आल्यानंतर ऐश्वर्याने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली. ऐश्वर्याने लिहिले होते,"सर्वांना नमस्कार, सर्वात आधी सादरीकरणादरम्यान जे काही झाले तेव्हा मला दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी खूप-खूप धन्यवाद. आता माझी प्रकृती स्थिर आहे. तुमचे प्रेम, पाठिंबा आणि समर्थन मला पुढे मला सकारात्मक दृष्टिकोण देते."

IPL_Entry_Point

विभाग