एआर रेहमानच्या घटस्फोटानंतर आता त्याच्यासोबत काम करणारी गिटारवादक मोहिनी डेची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने पतीपासून विभक्त होत असल्याची माहिती दिली आहे. रहमानच्या पोस्टच्या आधी मोहिनीने ही पोस्ट केली होती. काही काळाच्या अंतराने दोघांच्या पोस्ट समोर आल्या आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
ए. आर. रेहमान यांनी पत्नी सायरा बानो यांना घटस्फोट दिला आहे. दोघांच्या लग्नाला २९ वर्षे झाली आहेत. मोहिनी डे या गिटारवादक असून त्यांनी रहमानसोबत ४० हून अधिक कार्यक्रम केले आहेत. रेहमान यांच्या घटस्फोटाच्या काही तास आधी मोहिनीने पोस्ट केली आहे. आता लोक दोघांचे कनेक्शन जोडून ते व्हायरल करत आहेत.
मोहिनीने कुटुंबातील सदस्य, मित्र, अनुयायी आणि चाहत्यांना उद्देशून हा संदेश लिहिला आहे. "जड अंतःकरणाने मी जाहीर करू इच्छितो की मार्क आणि मी विभक्त झालो आहोत. माझे कुटुंबीय आणि मित्रांप्रती पहिली जबाबदारी म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा निर्णय परस्पर संमतीने घेण्यात आला आहे. आम्ही चांगले मित्र होतो, पण आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी हव्या आहेत, म्हणून परस्पर संमतीने पुढे जाणे हाच उत्तम मार्ग होता" या आशयाची पोस्ट केली आहे.
पुढे मोहिनीने पोस्टमध्ये म्हटले की, ती अजूनही मार्कसोबत अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. दोघं एकत्र चांगले काम करतात त्यामुळे ते थांबणार नाही. लोकांनी खासगीपणाचा आदर करावा. मोहिनी ही २९ वर्षांची आहे. मोहिनीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
वाचा: ८ अफेअर्स, ३ लग्न करुनही आज आहे एकटी, पतीच्या अंत्यसंस्काराला गेली नाही झीनत अमान
सोशल मीडियावर नेटकरी मोहिनी आणि ए. आर. माधवनचे नाव जोडताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, दोघांमध्ये काही आहे का? एकाने लिहिलं, "पण आम्ही न्याय करू." सीआयडीचा मीम वापरुन एका यूजरने लिहिलं आहे, काहीतरी गडबड आहे. एकाने लिहिले की, "हळूहळू रहस्य उघडत आहेत." एकाने लिहिलं, "कदाचित हा बॅसिस्ट आणि रहमानजींचा अभेरे." ए. आर. रहमान आणि मोहिनी यांचे नाव जोडणे चुकीचे असल्याचेही काही जण लिहित आहेत.