छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो 'बिग बॉस १७' सध्या चर्चेत आहे. लवकरच या शोचा विजेता घोषीत केला जाणार आहे. त्यापूर्वी बिग बॉसच्या घरात वेगवेगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत. आता बिग बॉस १७च्या घरातील स्पर्धक अंकिता लोखंडेला मोठा धक्का बसला आहे. काय ते वाचा...
'बिग बॉस १७'चा फिनाले विक जसा जवळ येत आहे तसतसे शोमध्ये वेगवेगळे धमाके होताना दिसत आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरातून ईशा मालविश बाहेर पडली. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. आता विजेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यानंतर आता शोमध्ये आणखी नवा ट्विस्ट आला आहे.
वाचा: नम्रता शिरोडकर मनोरंजन विश्वातून गायब का झाली? महेश बाबू ठरला होता कारण!
कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवरुन चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. या पोस्टवर जनतेने बिग बॉस १७चा विजेता निवडावा असे म्हटले आहे. मात्र, या पोस्टरवर एक हैराण करणारी गोष्ट चाहत्यांच्या निदर्शनास आली ती म्हणजे पोस्टरवर अंकिता लोखंडेचे नाव नाहीय त्यामुळे अंकिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपल्याचे अनेकांना वाटत आहे. या पोस्टरवर मुनव्वर फारूकी, मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमार यांचे लिहिण्यात आले आहे.
अंकिता लोखंडे गेममधून बाहेर पडली आहे. त्यामुळे आता बिग बॉस १७च्या ट्रॉफिवर मुनव्वर फारूकी, मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमार या तीन स्पर्धकांपैकी कोण नाव कोरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'बिग बॉस १७'च्या विजेत्याला एक ट्रॉफी, आलिशान कार आणि ५० लाख रुपयांचे रोख बक्षिस मिळणार आहे. या बक्षिसाने एखाद्या स्पर्धकाचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक ट्रॉफीवर त्याचे नाव कोरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या