बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे गेल्या काही काळापासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनन्याचे नाव भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतही जोडले गेले होते. आता अनन्या दुसऱ्या कुणाला तरी डेट करत असल्याचे समोर आले आहे. अनन्याचे नाव एक परदेशी व्यक्तीशी जोडले जात आहे. ही व्यक्ती नेमकी कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
अनन्या गेल्या काही दिवसांपासून कठीण काळातून जात आहे. आदित्यसोबतचा तिचा ब्रेकअप हा सर्वांसाठीच धक्कादायक होता. त्यानंतर अनन्याने स्वत:ला वेळ दिला. आयुष्यात आपल्याला काय हवे काय नको याचा विचार केला. आता अनन्या तिच्या आयुष्यात भूतकाळ विसरुन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनन्या एका माजी मॉडेल वॉकर ब्लॅंकोला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अनन्याने अंबानी कुटुंबाच्या नुकत्याच झालेल्या लग्न समारंभात वॉकरशी सर्वांची ओळख करून दिली. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वॉकरला अंबानींच्या घरातील लग्नाचे आमंत्रण होते. या लग्नसोहळ्यात दोघेही एकत्र होते. अनेकांनी त्यांना एकत्र फिरताना पाहिले. दोघांनी एकत्र डान्स देखील केला होता. काही रिपोर्ट्सनुसार, अनन्या आणि वॉकर अंबानी कुटुंबाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये भेटले होते. अनन्या आणि वॉकरचे काही फोटोही व्हायरल होत आहेत.
नुकताच अनन्याचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. खरं तर ती मुंबईत दिसली होती आणि यावेळी तिने एडब्ल्यूचे पेंडंट परिधान केले होते. आता हे फोटो पाहून एडब्ल्यू म्हणजे काय, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. अ अनन्या आहे, पण डब्ल्यूचे काय? सध्या अनन्या आणि वॉकरयांच्या डेटींच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे चाहते पेंडंटला वॉकरशी जोडत आहेत.
वाचा: 'मला महाराष्ट्राचे राजकारण तुझ्यात दिसतंय', अंकिता वालावलकरचा छोट्या पुढारीला टोला
अनन्याच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती आता सीटीआरएल या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती विक्रमादित्य मोटवानी आणि निखिल द्विवेदी यांनी केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.