बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'भोला' हा चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस उलटले आहेत. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अॅक्शनचा भरणा करण्यात आला आहे. हा चित्रपट 'कैथी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता चित्रपट १०० कोटी रुपयांचा पल्ला गाठणार का? असा प्रश्न पडला आहे.
भोला चित्रपटाने प्रदर्शनाच्या २० दिवसात ८६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता पुढच्या दोन दिवसात चित्रपट १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामिल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण येत्या शुक्रवारी सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाकडे वळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
वाचा: अशुतोष घेतोय अरुंधतीची काळजी; दोघांचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल
समोर आलेल्या माहितीनुसार, भोला हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास ११.२० कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवसाची दमदार कमाई पाहून चित्रपटातून अपेक्षा वाढल्या होता. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. ३१ मार्च म्हणजे शुक्रवारी चित्रपटाने केवळ ७.४० कोटी रुपयांची कमाई केली. दोन दिवसात चित्रपटाने १८.६० कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई निराशाजण असल्याचे म्हटले जात होते. आता चित्रपटाने ८६ कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे.
‘भोला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यांच्यासोबत मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव हे कलाकार देखील दिसत आहे. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी सहित तमिळ भाषेत प्रदर्शित झाला.
संबंधित बातम्या