Ashwini Mahangade Talked about Politics: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. या मालिकेने गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनात विशेष घर करुन असल्याचे दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत अनघा हे पात्र अभिनेत्री अश्विनी महांगडे साकारत आहे. तिला एका मुलाखतीमध्ये राजकारणात एण्ट्री करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.
अश्विनी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने अनेकदा राजकीय विषयांवर बिनधास्तपणे मत मांडले होते. ते पाहून तिला 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत देताना 'भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का?' असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला जावई बनण्यास बोनी कपूरचा नकार?
“मी राजकारणात आताही आहे कारण, मी एक मतदार आहे. मतदार हा राजकारणातील सर्वात मोठा भाग आहे. कोणी आमदार आहेत, कोणी खासदार आहेत पण, यापेक्षा यांना निवडून देणारा मतदार हा सगळ्यात मोठा असतो. त्यामुळे पुढे जाऊन मला संधी मिळाली, तर लोकांसाठी काम करायला मला नक्की आवडेल. यामुळे माझाही आवाका वाढेल” असे अश्विनी म्हणाली.
वाचा: ऑस्कर न मिळवणाऱ्यांसाठी बम्पर गिफ्ट! १.४ कोटींच्या ‘गुडी बॅग’ मध्ये नेमकं काय?
पुढे अश्विनीने वडील राजकारणात सक्रिय असल्याचे सांगितले. “राजकीय गाभा मला माझ्या वडिलांपासून लाभलेला आहे. कारण, अगदी सरपंच पदाच्या निवडीपासून ते खासदारकीपर्यंत प्रत्येक गोष्टीत ते सहभागी असायचे. वडिलांच्या मागे प्रत्येक गोष्टीत आम्ही सुद्धा सहभागी व्हायचो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी घरातच शिकलेय. संधी मिळाली तर राजकारणात एक वेगळा अपवाद तयार करायला मला नक्कीच आवडेल. पण, सध्याची परिस्थिती फार वेगळी आहे. अशावेळी मी नेमकी कोणती विचारधारा स्वीकारावी याचा प्रश्न पडतो. आपला भारत हा सगळ्या जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा देश आहे. पण, आता आपण आपापसांत एवढी भांडणं करतो की, एकत्र कधी येणार? इतर गोष्टींवर कधी चर्चा करणार असा प्रश्न मला पडतो. त्यामुळे या सगळ्यावर मला बोलायची संधी मिळाली, तर निश्चितपणे आवडेल” असे अश्विनी म्हणाली.
संबंधित बातम्या