मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ira Khan Wedding: दोस्ती यारी... सलमान खानच्या घरी पार पडला आमिर खानच्या लेकीचा मेहंदी सोहळा!

Ira Khan Wedding: दोस्ती यारी... सलमान खानच्या घरी पार पडला आमिर खानच्या लेकीचा मेहंदी सोहळा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 03, 2024 01:25 PM IST

Ira Khan WeddingUpdates: आमिर खानच्या मुलीचा मेहंदी सोहळा ‘भाईजान’ सलमान खानच्या घरी पार पडला आहे.

Ira Khan Wedding Updates
Ira Khan Wedding Updates

Ira Khan Wedding Updates: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लाडकी लेक आयरा खान ही आज (३ जानेवारी) बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांनीही अतिशय साधेपणाने आपला विवाह सोहळा आयोजित केला आहे. दरम्यान या लग्न सोहळ्याआधी दोघांचेही काही खास विधी पार पडले आहेत. आयरा खान हिच्या हळदीचे आणि मेहंदीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तर, आमिर खानच्या मुलीचा मेहंदी सोहळा ‘भाईजान’ सलमान खानच्या घरी पार पडला आहे.

अत्यंत साधेपणाने नुपूर आणि आयरा यांचा विवाहसोहळा साजरा होत असून, यालाफारसं ग्लॅमरस देखील करण्यात आलेलं नाही. लग्नाच्या एक दिवस आधी सकाळी हळद लागल्यानंतर त्याच संध्याकाळी आयराचा मेहंदी सोहळा पार पडला. सलमान खानच्या घरी आयरा खानचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. मेहंदी सोहळ्यासाठी संध्याकाळी आमिर मोठा मुलगा जुनैद, किरण राव, आमिरचा धाकटा मुलगा आझाद आणि त्याच्या आईसोबत सलमानच्या घरी जाताना दिसला.

Nupur Shikhare: आमिर खानचा होणारा जावई किती शिकलाय? कमाई काय? वाचा...

आयरा खानचा मेहंदी सोहळा सलमानच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पार पडला. या दरम्यान संपूर्ण खान परिवार सलमानच्या घरी एकत्र जमला होता. आयरा आणि नुपूरच्या लग्नाला फक्त त्यांच्या कुटुंबातील लोक आणि जवळची मित्र मंडळी उपस्थित राहणार आहेत. यानंतर एक ग्रँड रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. आयरा आणि नुपूर यादोघांचे कोर्ट मॅरेज ३ जानेवारीला होणार आहे. यानंतर, लग्न उदयपूरमध्ये होणार आहे. १३ जानेवारीला मुंबईत रिसेप्शन होणार आहे.

आमिर खानच्या घरीच नूपूर आणि आयरा यांची पहिली ओळख झाली होती. लॉकडाऊन दरम्यान, आयरा खान तिच्या वडिलांच्या घरी म्हणजेच आमिर खानच्या घरी राहण्यासाठी गेली होती. याच ठिकाणी तिची नुपूरशी भेट झाली. त्यावेळी नुपूर आमिरचा फिटनेस कोच म्हणून काम करत होता. त्यावेळी आयराने देखील फिटनेस ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली होती. हळूहळू नुपूर आणि आयरा यांची मैत्री झाली. तर, काही दिवसांनी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आयराने २०२१ मध्ये तिच्या या नात्याचा खुलासा केला होता.

WhatsApp channel