मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ira Khan Wedding: नऊवारी साडी अन् मराठमोळा साज; आयराच्या लग्नासाठी सजल्या आमिरच्या एक्स पत्नी!

Ira Khan Wedding: नऊवारी साडी अन् मराठमोळा साज; आयराच्या लग्नासाठी सजल्या आमिरच्या एक्स पत्नी!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 02, 2024 04:53 PM IST

Ira Khan Wedding Update: रीना दत्ता आणि किरण राव दोघीही आमिर खान याच्या घरी पोहोचल्या आहेत. यावेळी दोघींच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

Ira Khan Wedding Update
Ira Khan Wedding Update

Ira Khan Wedding Update: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान उद्या म्हणजेच ३ जानेवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. आयरा खान हिच्या लग्न विधींना आता सुरुवात झाली आहे. आयरा खानच्या लग्नाच्या निमित्ताने आता आमिर खानच्या घरी जय्यत तयारी सुरू झाली आहे. आयरा खानच्या लग्नाच्या निमित्ताने आमिर खानच्या दोन्ही माजी पत्नी सजून धजून लग्नाची तयारी करताना दिसल्या आहेत. रीना दत्ता आणि किरण राव दोघीही आमिर खान याच्या घरी पोहोचल्या आहेत. यावेळी दोघींच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. दोघीही यावेळी नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या अंदाजात लेकीच्या लग्नासाठी सज्ज झालेल्या दिसल्या.

आमिर खानची लाडकी लेक आयरा खान आता बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाली आहे. आयरा आता बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. आजपासून या जोडप्याच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये आमिर खानचे संपूर्ण कुटुंब लग्नाच्या सर्व विधींच्या तयारीत व्यस्त आहे. तर, आमिर खानच्या दोन्ही माजी पत्नी किरण राव आणि रीना दत्ता देखील त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एकत्र दिसल्या होत्या. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओंमध्ये किरण राव कारमधून सामान बाहेर काढताना दिसत आहे.

तर, आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताही हिरव्या रंगाच्या साडीत घराबाहेर पडताना दिसली. यादरम्यान त्यांनी त्यांचा भावी जावई नुपूरसोबत क्लिक केलेले फोटोही पाहायला मिळाले. रीना दत्ताचे घरही फुलांनी सजलेले दिसले. मीडिया रिपोर्टनुसार, आयरा खान आणि नुपूर शिखरे उद्या म्हणजेच ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहेत. या लग्नानंतर आमिर खान मुंबईत ग्रॅंड वेडिंग रिसेप्शन देणार आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

WhatsApp channel