बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने ३ जानेवारी रोजी बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह केला. यानंतर आता ही जोडी उदयपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधीसह पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी नुपूर, आयरा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या उदयपूरमध्ये पोहोचले आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधांना सुरुवात झाली आहे. आयरा आणि नुपूरच्या मेहंदी सोहळ्यातील व्हिडीओ समोर आले आहेत.
मेहंदी सोहळ्यासाठी आयरा-नुपूरने खास लूक केला होता. आयरा लाइट ब्राउन आणि ऑफ व्हाइट शेडच्या लेहंग्यामध्ये पाहायला मिळाली. या लेहंग्यावर तिने छान ज्वेलरी घातली होती. तसंच नुपूर मरुन नेहरू जॅकेट आणि फिकट गुलाबी रंगाच्या कुर्तामध्ये दिसला. आयरा-नुपूरचा हा लूक चांगलाच चर्चेत आहे. अशातच मेहंदी सोहळ्यातला नुपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो काही मराठी कलाकारांबरोबर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
वाचा: ‘बिग बॉस मराठी’ फेम पुष्कर जोग सई लोकूरवर नाराज! म्हणाला ‘लग्नाला नाही बोलवलंस पण...’
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आयरा आणि नुपूरच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला आयरा आपल्या मैत्रिणींबरोबर डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर बादशाहच्या लोकप्रिय ‘जुगनू’ गाण्यावर नुपूर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. अभिनेता सिद्धार्थ मेनन व अभिनेत्री मिथिला पालकर हे कलाकार नुपूरसोबत जबरदस्त डान्स करत आहेत.
आयरा आणि नुपूरने ३ जानेवारीला मुंबईत लग्न केले. आता ते विधीवत सात फेरे घेणार आहेत. त्यांचा हा शाही लग्नसोहळा ८ ते १० जानेवारी दरम्यान उदयपूरच्या ताज अरावली रिसॉर्टमध्ये होणार आहे. लग्नाला येणाऱ्या सर्व पाहुण्यांना कोणतीही भेटवस्तू आणू नये, असे सांगण्यात आले आहे. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी रिसॉर्टमधील सर्व १७६ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या लग्न सोहळ्यासाठी आमिर खान, रीना दत्ता, किरण राव, जुनैद खान, आझाद राव खान, मिथिला पालकर, इम्रान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टन हे उदयपूरला पोहोचले आहेत.