मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nupur Shikhare: ना शेरवानी ना घोडा ना फेटा; जीमच्या लूकमध्ये आमिरच्या जावयाची हटके वरात

Nupur Shikhare: ना शेरवानी ना घोडा ना फेटा; जीमच्या लूकमध्ये आमिरच्या जावयाची हटके वरात

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 04, 2024 11:39 AM IST

Ira Khan And Nupur Shikhare Wedding : नुपूर शिखरेच्या वरातीतील हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने अक्षरश: टी-शर्ट आणि हाफ पँट लग्नासाठी घातली आहे.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding
Ira Khan And Nupur Shikhare Wedding

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ३ जानेवारी रोजी ताज लँड येथे विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नसोहळ्याती फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान, नुपूरने वरतीला केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

नुपूर हा शॉर्ट, ब्लॅक टीशर्ट आणि स्पॉर्ट्स शूज अशा लूकमध्ये धावत वेडिंग वेन्यूपर्यंत पोहोचला आहे. वेडिंग वेन्यूच्या गेटवर नुपूरने त्याच्या कुटुंबासोबत देखील डान्स केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो ढोलाच्या तालावर थिरकताना दिसला. नुपूरच्या या हटके वरातीने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: परदेशात शिफ्ट झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? डॉ. नेनेंनी सांगितले कारण

लग्नाच्या वेळी नुपूरने गेटबाहेर ढोल-ताशाच्या तालावर डान्स केला. त्यावेळी त्याचा मित्रपरिवार देखील तेथे सेम लूकमध्ये त्याच्यासोबत डान्स करताना दिसत होता. जवळपास १० मिनिटे नुपूर, त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार नाचताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स व्हिडीओचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी कमेंट करत नुपूरचे कौतुक केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुपूर आणि आयराने नुकताच रजिस्टर पद्धतीने विवाह केला. पण आता ८ जानेवारी उदयपूरमधील एका हॉटेलमध्ये त्यांचे रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनला बॉलिवूड कलाकारांना आमंत्रण देण्यात येणार आहे.

आमिर खानच्या घरीच नूपूर आणि आयरा यांची पहिली ओळख झाली होती. लॉकडाऊन दरम्यान, आयरा खान तिच्या वडिलांच्या घरी म्हणजेच आमिर खानच्या घरी राहण्यासाठी गेली होती. याच ठिकाणी तिची नुपूरशी भेट झाली. त्यावेळी नुपूर आमिरचा फिटनेस कोच म्हणून काम करत होता. त्यावेळी आयराने देखील फिटनेस ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली होती. हळूहळू नुपूर आणि आयरा यांची मैत्री झाली. तर, काही दिवसांनी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आयराने २०२१ मध्ये तिच्या या नात्याचा खुलासा केला होता.

WhatsApp channel