गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची लेक आयराच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. आयराने ३ जानेवारी रोजी रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यानंतर आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. आता १३ जानेवारी रोजी आयरा खानच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. या रिसेप्शनला अनेक कलाकार हजर होते. मात्र, आयराची सावत्र आई किरण राव कुठेही दिसली नाही.
आयरा आणि नुपूरचे रिसेप्शन मुंबईतील निता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले. या रिसेप्शनला जवळपास संपूर्ण बॉलिवूड हजर होते. रिसेप्शनमध्ये आयराने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर नुपूरने काळ्या रंगाचा नेहरु कुर्ता आणि सलवार घातली होती.
वाचा: मिस्ट्री मॅनसोबत दिसली कंगना रणौत, हातहात पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल
आमिर खान या रिसेप्शनला जुनैद आणि आजाद या दोन्ही मुलांसोबत पोहोचला होता. सलमान खान, सुश्मिता सेन, जुही चावला, माधुरी दीक्षित, बोनी कपूर, कपिल शर्मा, शहनाज गिल, जॅकी श्रॉफ, सोनाली बेंद्रे, रणबीर कपूर आणि इतर काही कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. मात्र, किरण राव कुठे दिसत नव्हती. किरणला काही काम आल्यामुळे ती येऊ शकली नाही असा अंदाज वर्तवला जात आहे.
आमिर खानचा जावई नुपूर शिखरेचा जन्म १७ ऑक्टोबर १९८५ साली पुण्यात झाला आहे. तर, तो लहानाचा मोठा मुंबईत झाला आहे. त्याने मुंबईतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने मुंबईतील महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. तर, आयरा खानने तिचे शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. यानंतर तिने नेदरलँडमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. नुपूर शिखरे हा इंडस्ट्रीमध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून सक्रिय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नुपूर शिखरे बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा वैयक्तिक ट्रेनर म्हणून काम करत होता. याशिवाय नुपूर फिटनेस एक्स्पर्ट आणि कन्सल्टेट आहे.
संबंधित बातम्या