Ira Khan Wedding: धावत लग्नासाठी पोहोचलेल्या नुपूरचा अवतार पाहून आयरा म्हणाली ‘जा अंघोळ कर!’ Video Vial
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ira Khan Wedding: धावत लग्नासाठी पोहोचलेल्या नुपूरचा अवतार पाहून आयरा म्हणाली ‘जा अंघोळ कर!’ Video Vial

Ira Khan Wedding: धावत लग्नासाठी पोहोचलेल्या नुपूरचा अवतार पाहून आयरा म्हणाली ‘जा अंघोळ कर!’ Video Vial

Jan 04, 2024 04:22 PM IST

Ira Khan And Nupur Shikhare Wedding: सँडो आणि स्पोर्ट्स हाफ पँटमध्ये स्वतःच्या लग्नात पोहोचलेल्या नुपूरला बघून आयरा खानने त्याला चांगलाच दम भरला.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding
Ira Khan And Nupur Shikhare Wedding

Ira Khan And Nupur Shikhare Wedding: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लाडकी लेक आयरा खान नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आयरा खान हिने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अतिशय साधेपणाने हा विवाह सोहळा पार पडला आहे. सँडो आणि स्पोर्ट्स हाफ पँटमध्ये स्वतःच्या लग्नात पोहोचलेल्या नुपूरला बघून आयरा खानने त्याला चांगलाच दम भरला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

नुपूर आणि आयरा त्यांच्या लग्नाच्या लूकमुळे देखील चर्चेत आहेत. त्याचबरोबर ते सोशल मीडियावर ट्रोल देखील होत आहेत. दरम्यान, त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आयरा नुपूरला अंघोळ करायला जा, असे सांगताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आयराच्या हातात माइक दिसत आहे. तर, सोबत रीना दत्ता, आमिर खान आणि आझाद देखील दिसत आहेत.

Deepika Padukone: दीपिका पदुकोणने आई होण्यासंदर्भात घेतला मोठा निर्णय! खुलासा करत म्हणाली...

या व्हिडीओमध्ये आयरा खान म्हणते की, 'नुपूर आता आंघोळ करणार आहे.' कारण, नुपूर शिखरे हा स्वतःच्याच लग्नात तब्बल ८ किलोमीटर धावून पोहोचला होता. आमिर खानचा होणारा जावई नुपूर हा शॉर्ट, ब्लॅक टीशर्ट आणि स्पॉर्ट्स शूज अशा लूकमध्ये तब्बल ८ किलोमीटर धावत लग्नाच्या ठिकाणी पोहोचला होता. फिटनेस ट्रेनर असणाऱ्या नुपूर शिखरे याने स्पोर्टी लूकमध्येच आयरासोबत लग्नगाठ बांधली. यावेळी तो खूप घामेजलेला होता. त्यामुळे कागद पत्र सही करून झाल्यानंतर आयराने त्याला थेट अंघोळीला जाण्यास सांगितलं.

यानंतर नुपूर देखील हसत हसत अंघोळीला निघून गेला. आयराचे दरडावणे ऐकून सगळेच हसू लागले. नुपूरने लग्नाच्या वेळी राखाडी रंगाची शॉर्ट्स आणि काळ्या रंगाची बनियान घातली होती. त्यानंतर अंघोळ करून आल्यानंतर नुपूरने निळ्या रंगाचा शेरवानी घातला होता. तर, आयरा खानने निळ्या रंगाचा ब्लाऊज आणि हलक्या गुलाबी-मोती रंगाचा नऊवारी स्टाईल आउटफिट घातला होता.

Whats_app_banner