मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ira Khan Wedding: ना हिंदू, ना मुस्लिम; ख्रिश्चन पद्धतीने पार पडला आमिरच्या लेकीचा विवाहसोहळा

Ira Khan Wedding: ना हिंदू, ना मुस्लिम; ख्रिश्चन पद्धतीने पार पडला आमिरच्या लेकीचा विवाहसोहळा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 11, 2024 08:15 AM IST

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे ख्रिश्चन पद्धतीने लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे.

Ira Khan Wedding
Ira Khan Wedding

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची लेक आयराच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. पण त्यांचा विवाहसोहळा हिंदू की मुस्लिम पद्धीतीने होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता? आता त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे.

आयरा आणि नुपरचा शाही विवाहसोहळा उदयपुरमधील ताज हॉटेलमध्ये पार पडला. त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने हा विवाहसोहळा केला. त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये नववधू आयराने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर नुपूर शिखरेने राखाडी रंगाचा फॉर्मल सूट घातला होता. हातात सुंदर फुलांचा बुके घेऊन आयरा रेड कार्पेटवर चालताना दिसून आली. दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसत आहेत.
वाचा: 'गुलाबी आँखे जो तेरी देखी', कपिल देव यांचा पत्नीसोबत रोमँटिक डान्स

आयरा आणि नुपूरने थाटामाटात लग्न केले आहे. त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयराने नुपूरसोबत ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केलं आहे. लग्नाआधी मेहंदी आणि संगीतासोहळ्याची झलक समोर आली होती.

यापूर्वी ३ जानेवारी रोजी नुपूर आणि आयराचा रजिस्टर पद्धतीने विवाह झाला. या सोहळ्याची देखील विशेष चर्चा रंगली. कारण नुपूर लग्नासाठी शॉर्टस पँट आणि हाफ टी-शर्ट घालून पळत पोहोचला होता. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

WhatsApp channel