मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ira Nupur Wedding: उदयपूरच्या ‘या’ आलिशान रिसॉर्टमध्ये आयरा आणि नुपूर करणार शाही विवाह!

Ira Nupur Wedding: उदयपूरच्या ‘या’ आलिशान रिसॉर्टमध्ये आयरा आणि नुपूर करणार शाही विवाह!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 07, 2024 10:56 AM IST

Ira Khan And Nupur Shikhare Wedding: आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी उदयपूरमध्ये शाही विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हे जोडपे कुटुंबासह उदयपूरला पोहोचले आहे.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding
Ira Khan And Nupur Shikhare Wedding

Ira Khan And Nupur Shikhare Wedding: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लाडकी मुलगी आयरा खान हिने ३ जानेवारीला बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केले. त्यांच्या या लग्न सोहळ्यात त्यांचे कुटुंबीय आणि दोघांचे काही जवळचे मित्र सहभागी झाले होते. आता आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी उदयपूरमध्ये शाही विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हे जोडपे कुटुंबासह उदयपूरला पोहोचले आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केले होते. आता ही जोडी ताज एंड येथे भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करून शाही विवाह करणार आहे. आता त्यांचा विवाह उदयपूरमध्ये अगदी शाही पद्धतीने होणार आहे.

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचे लग्न उदयपूरमधील ‘ताज अरवली’ या पंचतारांकित हॉटेल रिसॉर्टमध्ये होणार असून, त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नुपूर शिखरे हा त्याच्या लग्नातील आउटफिटमुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्याने जिमच्या कपड्यांमध्येच लग्न केले होते. आयराने देखील नऊवारी स्टाईल धोती घातल्याने ती ट्रोल झाली होती. तर, आयराचे वडील आमिर खान आणि त्यांच्या पत्नीने या लग्न सोहळ्यात शानदार डान्स केला होता.

Killer Soup: कोंकणा सेनसोबतच्या किसिंग सीनवर काय होती मनोज बाजपेयीच्या पत्नीची प्रतिकिया?

आमिर खानचा जावई नुपूर शिखरे हा प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग देतो. त्याच्या क्लायंटमध्ये सुष्मिता सेन आणि आमिर खानसारखे अनेक बडे स्टार्स आहेत. आयरा आणि नुपूरची पहिली भेटही फिटनेस ट्रेनिंगदरम्यान झाली होती. लॉकडाऊनच्या काळात आयरा नुपूरकडे फिटनेस ट्रेनिंग घेत होती. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

नूपुर आणि आयरा दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. दोघेही एकत्र खूप क्युट दिसतात. आयरा आणि नुपूर यांनी गतवर्षी १८ नोव्हेंबरला साखरपुडा केला होता. तर, ३ जानेवारी रोजी दोघे लग्न बंधनात अडकले होते. नुपूर आणि आयराच्या लग्नाचे विधी अतिशय साधेपणाने पार पडले होते. या लग्नात आमिर खानच्या दोन्ही माजी पत्नी म्हणजेच रीना दत्ता आणि किरण राव या नऊवारी नेसून सजल्या होत्या.

WhatsApp channel