Ira Khan Wedding Details: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान याच्या घरात सध्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. सगळीकडेच खूप आनंदी वातावरण आहे. आमिर खान याची मुलगी आयरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. या जोडप्याने गेल्या वर्षी इटलीमध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांनी मुंबईत एंगेजमेंट पार्टीचे आयोजन केले होते. आता आयरा आणि नुपूर यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. आमिर खानची लेक आयरा खान कधी आणि कुठे सात फेरे घेणार? जाणून घेऊया...
मीडिया रिपोर्टनुसार, आयरा आणि नुपूर यांचं लग्न जानेवारीच्या पहिल्या वीकेंडला उदयपूरमधील एका मोठ्या लॉनमध्ये होणार आहे. याआधी ३ जानेवारीला आयरा आणि नुपूरचं कोर्ट मॅरेज होणार आहे. त्यानंतर लग्नाच्या सर्व विधींना सुरुवात होईल. सध्या तरी दिल्लीत लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्याचे कोणतेही नियोजन नाही. मात्र, १३ जानेवारीला मुंबईत इंडस्ट्रीतील मित्र परिवारासाठी मोठे वेडिंग रिसेप्शन आयोजित केले जाणार आहे. सध्या आमिर खान आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. नुकताच तो मुंबईतील एका मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानात आपल्या मुलीसाठी दागिने खरेदी करताना दिसला होता.
आमिर खानची मुलगी आयरा खान हिच्या लग्नात बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावण्याची शक्यता आहे. सलमान खान, जुही चावला, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, हृतिक रोशन, शाहरुख खान आणि करीना कपूर खान हे आमिरच्या लाडक्या लेकीच्या लग्नाला हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय देखील अनेक बडे स्टार्स देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.
आयरा आणि नुपूर यांचं नातं २०२०मध्ये लॉकडाऊन दरम्यान सुरू झालं. त्यावेळी आयरा तिच्या वडिलांच्या घरी म्हणजेच आमिरच्या घरी राहत होती. नुपूर शिखरे हा आमिर खानचा फिटनेस ट्रेनर होता. या दरम्यान आयरा देखील त्यांच्याकडून फिटनेस ट्रेनिंग घेऊ लागली होती. या दम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि ते हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले. आता दोघेही लग्न करणार आहेत.