International Women's Day 2024 Special Film And Web Series: ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी स्त्री शक्तीला नमन करून तिचं कौतुकही केलं जातं. बॉलिवूडच्या चित्रपट आणि वेब सीरिजमधून देखील महिला शक्तीचं एक अनोखं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. चला तर, बघूया अशाच काही चित्रपट आणि वेब सीरिजची यादी...
'आर्या'च्या तिसऱ्या सीझनमधून दमदार पुनरागमन करून सुष्मिता सेनने पुन्हा एकदा एक जबरदस्त कलाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. तिच्या ‘आर्या’ या व्यक्तिरेखेला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडूनही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सुष्मिताचे हे पात्र हे पारंपारिक नायिकेच्या अगदी विरुद्ध आहे. या सीरिजमध्ये तिने ॲक्शन-ओरिएंटेड, बोल्ड पात्र चपखल साकारले आहे. ही कथा एका आईची आहे, जी आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते.
‘जाने जान’ ही सीरिज करीना कपूरने साकारलेल्या ‘माया डिसूझा’ या पात्राभोवती फिरते. माया एक सिंगल मदर आहे. तिचा नवरा अचानक गायब होतो, तेव्हापासून तिच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण. आई म्हणून तिची सामान्य भूमिका असूनही, माया स्त्रीच्या प्रत्येक रूपाचं दर्शन घडवते. कुटुंबाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ती अनेक प्रयत्न करते.
राणी मुखर्जीच्या 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका स्त्रीचे भावनिक चित्रण क्ले आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीने तिच्या अभिनय कौशल्याचा जलवा दाखवला आहे. या चित्रपटातही आपल्या कुटुंबासोबत परदेशात राहणाऱ्या एका स्त्रीच्या आयुष्यातील संघर्ष दाखवला आहे.
अनुराग बासूच्या ‘बर्फी’ या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्राने झिलमिल या ऑटिझम असलेल्या तरुणीची भूमिका साकारली होती. प्रियांका चोप्राने साकारलेल्या या महत्त्वपूर्ण भूमिकेने बॉलिवूडमधील मानसिक आरोग्याभोवतीच्या रूढींना आव्हान दिले. एका संवेदनशील विषयाचे चित्रण यातून हलक्याफुलक्या पद्धतीने करण्यात आले आहे.
विकास बहलच्या ‘क्वीन’ या चित्रपटामध्ये कंगना रनौत ‘राणी मेहरा’च्या भूमिकेत दिसली आहे. लग्न रद्द झाल्यानंतर एकटीच हनीमूनला निघालेल्या राणीची कथा यात दाखवण्यात आली आहे. राणीचा हा प्रवास सामाजिक अपेक्षांपासून मुक्त होण्याचा आणि स्वतःच्या अटींवर स्वतःला पुढे नेण्याचे प्रतीक आहे.
विद्या बालनने मिलन लुथरियाच्या ‘द डर्टी पिक्चर’ सिल्क स्मिताच्या या धाडसी व्यक्तिरेखेने बॉलिवूडमधील स्त्रीत्वाच्या परंपरागत नियमांना आव्हान दिले. हा चित्रपट बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साऊथ अभिनेत्रीच्या अशांत जीवनाचा शोध घेतो.
इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण तारा महेश्वरीच्या भूमिकेत दिसली आहे. तर ही समाजाची सगळी बंधनं झुगारून जीवनात स्वतःचा वेगळा मार्ग निवडते. हा चित्रपट महिलांना त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वीकारण्यास, तसेच नातेसंबंध आणि वैयक्तिक गोष्टी सांभाळताना सामाजिक नियमांना आव्हान देण्यास प्रोत्साहित करतो.