बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे लग्झरी आयुष्य हे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कलाकारांची घरे ही सर्वांचे मोठे आकर्षण ठरते. चाहत्यांना ही घरे पाहायला नेहमी आवडतात. बॉलिवूडमधील सध्याचे सर्वांचे आवडते कपल अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घराचे काम सुरु आहे. आता त्यांच्या २५० कोटी रुपयांच्या घरातील स्वयंपाक घर कसे आहे याचा व्हिडीओ समोर आला आहे. चला पाहूया आलियाचे स्वयंपाक घर कसे आहे.
एका सेलिब्रिटी शेफने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या किचनची झलक दाखवली आहे. सध्या हे दाम्पत्य आपली मुलगी राहा कपूरसोबत पाली हिलमध्ये राहत असले तरी लवकरच ते वांद्रे येथील सहा मजली बंगल्यात राहायला जाणार आहेत. २०२२मध्ये लग्न झाल्यानंतर आलिया आणि रणबीर या घरात शिफ्ट होणार होते. आता लवकरच ते या घरात शिफ्ट होणार आहेत.
व्हिडिओमध्ये शेफ किचनमध्ये पाऊल ठेवताच काही तरी शिजवण्याच्या तयारीत दिसत आहे. पण व्हिडीओमध्ये दिसणारे आलियाच्या घरातील स्वयंपाक पाहून सर्वजण चकीत झाले आहेत. कारण २५० कोटी रुपये किंमत असलेल्या आलियाच्या घरातील स्वयंपाक घर हे अतिशय साधे आणि सिंपल दिसत आहे. आलिया आणि रणबीर कपूरने याला पर्सनल टच देत काही गोष्टी जोडल्या. फ्रिजवर अनेक गोंडस प्राण्यांचे चुंबक दिसत आहेत. एका भिंतीवर आलिया, रणबीर आणि राहा यांचे स्केच दिसत होते. त्याखाली एक टीव्ही दिसत आहे.
तसेच स्वयंपाक घरात लागणारी उपकरणे ठेवली आहेत. तसेच सूर्यप्रकाश येण्यासाठी एक मोठी खिडकी देखील ठेवली आहे. तसेच आलियाचे स्वयंपाक घर हे सेंट्रलाइज एसी आहे. शेफनी पास्ता, बिर्याणी, पिझ्झा, चिकन असे काही पदार्थ बनवले आहेत. शेफने हा व्हिडीओ शेअर करत, "आजच्या एपिसोडमध्ये आम्ही #ranbirkapoor, @aliaabhatt आणि बेबी राहासाठी स्वयंपाक करत आहोत!" असे कॅ्प्शन दिले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केली आहे. एका यूजरने "हे अतिशय बेसिक आणि साधे स्वयंपाकघर आहे" असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत, 'अनपेक्षितपणे, हे केवळ दैनंदिन वापरासाठी डिझाइन केले गेले आहे' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने, "पाली हिलमधील एका अपार्टमेंटच्या घरात हे स्वयंपाकघर आहे हे लक्षात घेता हे खूप मोठे आहे. हा देशातील सर्वात महागड्या परिसरांपैकी एक आहे" असे म्हटले आहे.
वाचा: माहिती आहे का राज कपूर यांनी केले आहे 'या' मराठी सिनेमामध्ये काम, अशोक सराफ होते मुख्य भूमिकेत
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, रणबीर या बंगल्याचे नाव त्याच्या आणि आलियाची मुलगी राहाच्या नावावर ठेवणार आहे. यामुळे राहा बॉलिवूडमधील 'सर्वात तरुण आणि श्रीमंत स्टार किड' बनेल, असे म्हटले जात आहे.