Indrayani: 'इंद्रायणी' मालिकेतील इंदू आणि 'बिग बॉस मराठी'फेम इरिना रूडाकोवा एकत्र! काय आहे भानगड?-indrayani serial update erina rudakova enter ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Indrayani: 'इंद्रायणी' मालिकेतील इंदू आणि 'बिग बॉस मराठी'फेम इरिना रूडाकोवा एकत्र! काय आहे भानगड?

Indrayani: 'इंद्रायणी' मालिकेतील इंदू आणि 'बिग बॉस मराठी'फेम इरिना रूडाकोवा एकत्र! काय आहे भानगड?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 28, 2024 01:32 PM IST

Indrayani Promo: 'इंद्रायणी' मालिकेत 'बिग बॉस मराठी' स्पर्धक इरिना रूडाकोवाची एण्ट्री झाल्यामुळे सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत. आता मालिकेत इरिना कोणत्या भूमिकेत दिसणार चला जाणून घेऊया...

Indrayani
Indrayani

'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'इंद्रायणी' ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील इंदूने सर्वांची मने जिंकली आहे. मालिकेतील इंदूचा अभिनय या सर्वांना आवडत आहे. अशातच इंदू आणि 'बिग बॉस मराठी' फेम इरिना रूडाकोवाचे फोटो- व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे इरिना आणि इंदूमध्ये नक्की काय शिजतंय, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आता 'कलर्स मराठी' वाहिनीने 'इंद्रायणी' मालिकेचा नवा प्रोमो शेअर करत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 'बिग बॉस मराठी'फेम इरिना रूडाकोवाची 'इंद्रायणी' मालिकेत एन्ट्री झाली आहे.

काय पाहायला मिळणार?

'इंद्रायणी' मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये विठूच्या वाडीत आलेली एक गोरीपान फॉरेनर दिसून येत आहे. तिचं परीसारखं रूप, सोनेरी केस अशा सर्वच गोष्टींची विठूच्या वाडीला भूरळ पडलेली पाहायला मिळत आहे. ही परी दुसरीतिसरी कोणी नसून 'बिग बॉस मराठी' फेम इरिना रूडाकोवा आहे. इरिनाच्या येण्याने 'इंद्रायणी' मालिकेत काय गमतीजमती घडतात? तिची डॉक्यूमेंट्री पूर्ण होणार की नाही? इंदू आणि इरिनाची मैत्री होणार का? तसेच इरिना कीर्तनही शिकणार का? या सर्व गोष्टी 'इंद्रायणी' मालिकेच्या आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

इरिनाने व्यक्त केल्या भावना

'इंद्रायणी' या मालिकेबद्दल बोलताना इरिना रूडाकोवा म्हणाली,"इंद्रायणी' ही मालिका माझ्यासाठी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. मालिकेतील माझं पात्र खूप गोड आणि सकारात्मक आहे. त्यामुळेच हे पात्र मला खूप भावलं. सेटवरील सगळ्यांसोबत काम करताना मजा येतेय. मजा करण्यासह इथला प्रत्येक जण खूप मेहनतीने काम करत आहे."
वाचा: रमेश सिप्पी यांनी 'शोले'चे दिग्दर्शन केलेले नाही; सचिन पिळगावकर यांचा चकीत करणारा खुलासा

इरिना पुढे म्हणाली,"मालिकेत 'इंद्रायणी'च्या भूमिकेत दिसणारी चिमुकली म्हणजेच सांची भोईर खूपच गोड आहे. तिच्यासोबत काम करतानाचा अनुभवदेखील खूप कमाल आहे. तिच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. 'इंद्रायणी' ही मालिका आता माझ्या खूप जवळची झाली आहे. सेटवर मिळणारं प्रेम आणखी छान काम करण्याचं प्रोत्साहन देत आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबियांसोबत दररोज 'इंद्रायणी' मालिका नक्की पाहावी. या मालिकेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल 'कलर्स मराठी' वाहिनीचे आभार."

Whats_app_banner
विभाग