हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री या केवळ चित्रपटांमध्येच अभिनय करत नाहीत, तर व्यवसायही चालवतात. यातील काहींनी अभिनय सोडून व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. इतकंच नाही तर या अभिनेत्री आपल्या बिझनेसमधून कोट्यवधींची कमाईही करत आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील कोणतीही हिरोईन ही एका अभिनेत्याला टक्कर देताना कमी पडत नाही. चला तर मग जाणून घेऊया भारतातील टॉप पाच सर्वात श्रीमंत अभिनेत्रींविषयी.
हुरुनने भारतातील टॉप दहा श्रीमंत अभिनेत्रींची यादी जाहिर केली आहे. या यादीत ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. रिपोर्टनुसार, जुहीची एकूण संपत्ती ४६०० कोटी रुपये आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जुहीने गेल्या १० वर्षांपासून एकही हिट चित्रपट दिलेला नाही. ती शाहरुख खानच्या रेड चिलीज आणि आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सकडून पैसे कमावते. याशिवाय रिअल इस्टेट कंपन्यांमध्येही तिने गुंतवणूक केली आहे.
समोर आलेल्या या यादीमध्ये विश्व सुंदरी, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुहीप्रमाणेच ऐश्वर्याही चित्रपटांमध्ये फारशी अॅक्टिव्ह असल्याचे दिसत नाही. असे असूनही तिच्याकडे ८५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यानंतर ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा तिच्या ब्रँड, प्रॉडक्शन कंपनी आणि हॉलिवूड चित्रपटांमुळे तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्याकडे एकूण ६५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यानंतर आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांचे नाव येते.
वाचा: तू हॉटेलमध्येच गाणे गा; अरिजीत सिंहची नक्कल करणाऱ्या स्पर्धकावर संतापला विशाल दादलानी
ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नयिन सेल्वन २' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता ती पुन्हा कोणत्या चित्रपटात दिसणार याविषयी माहिती समोर आलेली नाही. पण चाहते ऐश्वर्याला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी आतुर आहेत. ऐश्वर्या ही जास्त करुन कमाई ही चित्रपट आणि जाहिरातींमधून होते. ती सर्वासाठी तगडे मानधन घेत असल्याचे बोलले जाते.