७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चिदानंद एस. नाईक यांच्या ‘सनफ्लॉवर्स व्हेअर द फर्स्ट वन टू नो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे प्रथम पारितोषिक मिळाले असून, भारताला मोठा विजय मिळाला आहे. चिदानंद यांना मिळालेले पहिले पारितोषिक हे पाच वर्षांतील भारताचे दुसरे पारितोषिक आहे. एफटीआयआयच्या अश्मिता गुहा नेओगी यांना २०२० मध्ये ‘कॅटडॉग’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला होता.
चिदानंद आपल्या या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले की, ‘आमच्याकडे फक्त चार दिवस होते. मुळात मला हा चित्रपट बनवू नका असं सांगण्यात आलं होतं. हा लघुपट कर्नाटकातील (भारतातील) लोककथांवर आधारित आहे. याच कथा ऐकून आम्ही मोठे झालो, म्हणून मी लहानपणापासूनच ही कल्पना पुढे नेत होतो.’
निर्मात्याने अर्थात चिदानंद एस. नाईकने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या टेलिव्हिजन विंगमधील एक वर्षाचा कोर्स संपल्यानंतर हा चित्रपट बनवला. ‘सनफ्लॉवर्स व्हेअर द फर्स्ट वन टू नो’ हा चित्रपट एका कन्नड लोककथेवर आधारित आहे, जो कोंबडा चोरतो, आपले गाव सतत अंधारात बुडवतो. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रथम पारितोषिक विजेत्याला १५ हजार युरोचे अनुदान दिले जाते.
१६ मिनिटांच्या या लघुपटाचा प्रीमियर मंगळवारी दुपारी कान्स चित्रपट महोत्सवात झाला. बेल्जियन अभिनेत्री लुबना अझाबल यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय ज्युरीने जज केलेल्या १८ लघुपटांमध्ये ‘सनफ्लॉवर्स व्हेअर द फर्स्ट वन टू नो’ने बाजी मारली.
ला सिनेफ स्पर्धेत तिसरे पारितोषिक मानसी माहेश्वरीच्या ‘बनीहुड’ या अॅनिमेशन चित्रपटाला मिळाले. मेरठमध्ये जन्मलेल्या आणि निफ्ट दिल्लीची माजी विद्यार्थिनी असलेल्या मानसीने ब्रिटनच्या नॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलची विद्यार्थिनी म्हणून हा चित्रपट बनवला होता. चित्रपट महोत्सवात तृतीय पारितोषिक विजेत्याला ७,५०० युरोचे अनुदान दिले जाते.
कोलंबिया विद्यापीठाच्या अस्या सेगालोविच दिग्दर्शित 'आऊट ऑफ द विंडो थ्रू द वॉल' आणि ग्रीसमधील अॅरिस्टॉटल युनिव्हर्सिटी ऑफ थेसालोनिकीचे निकोस कोलिओकोस यांनी तयार केलेल्या 'द कॅओस शी लेफ्ट बिहाइंड' या लघुपटांना द्वितीय पारितोषिक मिळाले. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये द्वितीय पारितोषिक विजेत्याला ११,२५० युरोचे अनुदान दिले जाते. पुरस्कार प्राप्त चित्रपट ३ जून रोजी सिनेमा डू पॅन्थिऑन आणि ४ जून रोजी एमके २ क्वाई डी सीन येथे दाखविण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या