बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. ती फिटनेस, फॅशन आणि डान्ससाठी विशेष ओळखली जाते. तसेच वयाची ५०शी ओलांडल्यानंतरही मलायका अतिशय हॉट दिसत देते. ती एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवेल इतकी फिट आहे. पण सध्या सोशल मीडियावर मलायकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका रेमोसोबत जमिनीवर लोळून डान्स करताना दिसत आहे. ते पाहून गीता माँ देखील चिडली आहे. आता नेमकं काय झालं आहे? चला जाणून घेऊया...
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर’ या शोमधील आहे. या शोमध्ये मलायका लाल रंगाचा बॉडी हगिंग ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. तसेच कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि मलायका हे दोघेही नोरा फतेहीच्या ‘हाय गर्मी’ या गाण्यावर डान्स करतात. मात्र या दोघांचा सिझलिंग डान्स पाहून कोरिओग्राफर गीता कपूर ऊर्फ गीता माँ चांगलीच भडकली आहे.
व्हिडीओमध्ये रेमो आणि मलायकाचा हॉट डान्स पहायला मिळत आहे. ‘हाय गर्मी’ या गाण्यावर मलायका नोराची हुक स्टेप करताना दिसते. अगदी जमिनीवर लोळून मलायका ही स्टेप करते. दोघांचा हा डान्स पाहून गीता चिडते आणि म्हणते, “आता हे अति होतंय. माझ्या मनाला हे खूप लागलंय. या मस्करीचं उत्तर आता गंभीरपणे देणार.” त्यानंतर मलायका आणि रेमो दोघांच्या चेहऱ्यावर बारा वाजल्याचे भाव दिसून येतात. यापुढे काय घडणार, हे शोच्या एपिसोडमध्येच पहायला मिळेल. मात्र मलायका आणि रेमोच्या या डान्सने नेटकऱ्यांचं चांगलंच लक्ष वेधलंय.
वाचा: 'कपिल शर्मा शो'मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर
गेल्या काही दिवसांपासून मलायका ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मलायकाने अभिनेता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप केल्यानंतर या सर्व चर्चा रंगल्या. त्यानंतर ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. तिने एका पोस्टच्या माध्यमातून सिंगल असल्याचा ईशारा दिला आहे. तसेच मलायका काही दिवसांपूर्वी एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली. त्याच्या हातात हात पकडून ती चालताना दिसली. त्यामुळे मलायका या व्यक्तीलाच डेट करतेय की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तो मलायकाचा मित्र किंवा प्रोफेशनल पार्टनर असू शकतो, असाही अंदाज काहींनी वर्तवला होता.
संबंधित बातम्या