सोनी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'इंडियाज बेस्ट डान्सर' पाहिला जातो. या कार्यक्रमात सहभागी होणारे कलाकार स्वत:ची अशी वेगळी छाप सोडून जातात. तसेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे अनेकदा नशीब देखील पलटते. त्यांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळते. आता लवकरच 'इंडियाज बेस्ट डान्सर' कार्यक्रमाचा चौथा सिझन येणार आहे. पण या सिझनमध्ये सहभागी होण्यासाठी जर तुम्हाला ऑडिशन द्यायचे असेल तर जाणून घ्या कधी आणि कुठे होणार ऑडिशन...
वाचा : अमोलमुळे अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार? 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत मोठा ट्विस्ट
‘इंडियाज बेस्ट डान्सर’चा शोध घेण्याचा प्रवास निर्मात्यांनी १ जून २०२४ रोजी पासून सुरु करण्याचे ठरवले आहे. पहिले ऑडिशन हे स्वप्ननगरी मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. जर तुम्हाला पहिले ऑडिशन द्यायचे असेल तर १ जून २०२४ रोजी अंधेरीमधील ऑफ साकी विहार रोड येथील नाहर इंटरनॅशनल स्कूल पोहोचा. या इंटरनॅशनल स्कूलमध्ये ऑडिशन होणार आहेत.
वाचा: तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल! 'आम्ही जरांगे' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळते. मुंबईच्या ऑडिशनमध्ये स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत जे. पाठक, सीझन 2 ची विजेता सौम्या कांबळे आणि सीझन 3 मधले स्पर्धक बूगी एलएलबी, शिवांशु सोनी, आणि विपुल कांडपाल हे उपस्थित असणार आहेत. हे सर्व कलाकार कार्यक्रमाची शोभा वाढवतील यात शंकाच नाही.
वाचा: हे निराशाजनक आहे; 'ऑल आइज ऑन रफा' पोस्ट माधुरीने डिलिट करताच नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
मुंबईतील ऑडिशनविषयी पुनीत पाठक म्हणतो, “मुंबई म्हणजे भारतीय मनोरंजनाचे स्पंदण पवणारे हृदय आहे, जेथे स्वप्नांना पंख फुटतात आणि तारे जन्माला येतात. आम्ही या शहरातील नवीन डान्स सेंसेशन शोधत आहोत. एक असे रत्न, जे मंचावर येऊन चमकण्यास सज्ज असेल. इंडियाज बेस्ट डान्सर हा तुमचा ध्यास सत्यात उतरविण्याची एक संधी आहे. ही संधी गमावू नका १ जून २०२४ रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूल, अंधेरी येथे या तुमचे कसब आम्हाला दाखवा!”
वाचा: नारीचा आत्मा काही वेगळ्याच कारणासाठी आला आहे; ‘अल्याड पल्याड'चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित
संबंधित बातम्या