सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल लवकरच आपला नवा सीझन घेऊन परतणार आहे. इंडियन आयडॉलचा नवा सीझन २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यंदा श्रेया घोषाल, बादशाह आणि विशाल ददलानी परीक्षकांच्या खुर्चीवर बसलेले दिसणार आहेत. दरम्यान, या शोचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विशाल ददलानी एका स्पर्धकाला चांगलेच सुनावताना दिसत आहे.
इंडियन आयडॉल १५मध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध गायक आतिफ अस्लमचे गाणे गायले आहे. पण हे गाणे त्या स्पर्धकाने स्वत:च्या स्टाइलमध्ये गायचे सोडून अतिफ अस्लमची स्टाईल कॉपी केली आहे. ते पाहून शोचा स्पर्धक विशाल दादलानी चिडला आहे.विशालने गाणे मध्येच थांबवले आणि स्पर्धकाला सांगितले की, जर तू त्याची कॉपी करत राहिलास तर तू रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये गात राहशील.
सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर इंडियन आयडॉल १५चा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये २१ वर्षीय लक्ष्य मेहता आतिफ अस्लमचे 'पहली नजर में' हे गाणं गात असल्याचे दिसत आहे. हे गाणं ऐकताच श्रेया कानाला लावलेले हेडफोन काढून ठेवते. यानंतर विशाल गाणाऱ्या स्पर्धकाला थांबवतो आणि म्हणतो, "असं गाऊ नकोस. हे इंडियन आयडॉल आहे. येथून आयडॉल घडत असतात. त्यामुळे तू नक्कल करण्याचा प्रयत्न करु नकोस. तो खूप मोठा कलाकार आहे. ज्या दिवशी तुम्ही त्याला कॉपी करायला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गाण्याच्या लायक बनाल."
सध्या सोशल मीडियावर इंडियन आयडॉल १५ मधील हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने, 'एकदम बरोबर आहे विशाल सर तुमचे' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'अन्नू मलिक असते तर बँड वाजला असता' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने "मस्त सल्ला सर" अशी कमेंट केली आहे.
वाचा: अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू, शब्दही फुटत नव्हते
इंडियन आयडॉल २६ ऑक्टोबरपासून दर शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता सोनी टीव्हीवर पाहता येणार आहे. इंडियन आयडॉलचा पहिला सीझन २००४ साली सुरू झाला होता. तर या रिअॅलिटी शोचा पहिला सीझन गायक अभिजीत सावंतने जिंकला होता.
संबंधित बातम्या