Indian Idol 14 Winner: ‘इंडियन आयडॉल १४’ जिंकणाऱ्या वैभव गुप्ताला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ऐकलीत का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Indian Idol 14 Winner: ‘इंडियन आयडॉल १४’ जिंकणाऱ्या वैभव गुप्ताला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ऐकलीत का?

Indian Idol 14 Winner: ‘इंडियन आयडॉल १४’ जिंकणाऱ्या वैभव गुप्ताला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ऐकलीत का?

Mar 04, 2024 07:41 AM IST

Indian Idol 14 Winner Prize Money: ‘इंडियन आयडॉल’च्या १४व्या पर्वाला त्यांचा विजेता मिळाला आहे. कानपूरचा गायक वैभव गुप्ता याने 'इंडियन आयडॉल १४’चे विजेतेपद पटकावले आहे.

Indian Idol 14 Winner Prize Money
Indian Idol 14 Winner Prize Money

Indian Idol 14 Winner Prize Money: नुकताच 'इंडियन आयडॉल'च्या १४व्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडला. ‘इंडियन आयडॉल’च्या १४व्या पर्वाला त्यांचा विजेता मिळाला आहे. कानपूरचा गायक वैभव गुप्ता याने 'इंडियन आयडॉल १४’च्या विजेतेपदाचा खिताब जिंकला आहे. या शोमध्ये शेवटपर्यंत टिकून राहिलेल्या यादीच्या ‘टॉप ६’ फायनलिस्ट होते, ज्यात वैभव गुप्ता, सुभदीप दास, आद्य मिश्रा, अंजना पद्मनाभन, पीयूष पनवार आणि अनन्या पाल यांचा समावेश होता. तर, वैभव गुप्ता याने या पाच जणांना मागे टाकून ‘इंडियन आयडॉल १४’ या शोची ट्रॉफी जिंकली आहे.

विजेत्याला काय काय मिळाले?

‘इंडियन आयडॉल १४’ची ट्रॉफी जिंकल्यावर वैभव गुप्ता याला ट्रॉफीसोबतच बक्षीस म्हणून २५ लाख रुपये मिळाले आहेत. इतकंच नाही तर, त्याला एक चकाचक कारही भेट म्हणून मिळाली आहे. 'इंडियन आयडॉल'च्या १४व्या सीझनचा विजेता ठरलेल्या विअभाव गुप्ता याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या शोच्या ६ अंतिम स्पर्धकांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळाली. पण, वैभवने सर्वांना पराभूत करून या शोची ट्रॉफी जिंकली. 'इंडियन आयडॉल १४'चा हा शेवटचा एपिसोड खूपच प्रेक्षणीय होता. या एपिसोडमध्ये सर्वांनी खूप धमाल केली. यावेळी शोमध्ये खास पाहुणा बनून आलेल्या सोनू निगमने या शोची शोभा आणखी वाढवली.

Marathi Serial TRP: ‘ठरलं तर मग’ पुन्हा ठरली अव्वल! पाहा या आठवड्यात ‘टॉप ५’ मालिकांमध्ये कुणी मिळवली जागा...

'इंडियन आयडॉल १४'च्या गायन स्पर्धेत वैभव गुप्ता विजेता ठरला. तर, सुभदीप दास-चौधरी याला प्रथम उपविजेता घोषित करण्यात आले आहे. यासह पियुष पनवार हा दुसरा उपविजेता ठरला, ज्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. अनन्या पाल ही तिसरी उपविजेती ठरली असून, तिला बक्षीस म्हणून ३ लाख रुपये आणि कारही मिळाली आहे.

‘या’ दिग्गजांनी निवडले विजेते

‘इंडियन आयडॉल १४’च्या महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता हुसैन कुवाजेरवाला याने केले. तर, विशाल ददलानी पुन्हा एकदा परीक्षकाच्या खुर्चीत पाहायला मिळाला. यासोबतच गायक कुमार सानू आणि गायिका श्रेया घोषाल यांनी देखील या शोच्या परीक्षक पदाची धुरा सांभाळली. ‘इंडियन आयडॉल १४’च्या विजेतेपदाची ट्रॉफी जिंकल्यावर वैभवने आनंद व्यक्त केला आणि म्हणाला की, ‘माझा खरंच यावर विश्वास बसत नाहीये की, मी हा शो जिंकला आहे. देशभरातील लोकांची मनं जिंकली आहेत.’

Whats_app_banner