'सुपरस्टार सिंगर 2' आणि 'इंडियन आयडल १२'ची कॅप्टन सायली कांबळे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. रविवारी २४ एप्रिल रोजी मुंबईतील कल्याणमधील रॉयल गार्डनमध्ये हा विवाह पार पडला. सायलीने तिचा प्रियकर धवल पाटीलसोबत लग्नगाठ बांधली.
सायलीने तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात सायलीच्या लग्नातील काही क्षण दाखवण्यात आले आहेत. सायली आणि धवल यांनी महाराष्ट्रीय रितीरिवाजाप्रमाणे लग्न केलं. 2021 च्या अखेरीस सायलीने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता