कोणी देशभक्तीपर सिनेमात काम केले तर कोणी नाटकात; स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत कलाकारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा-india independence day celebrity share special memories ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कोणी देशभक्तीपर सिनेमात काम केले तर कोणी नाटकात; स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत कलाकारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

कोणी देशभक्तीपर सिनेमात काम केले तर कोणी नाटकात; स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत कलाकारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 15, 2024 07:59 AM IST

India Independence Day: आज संपूर्ण भारतात १५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. कलाकारांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

India Independence Day
India Independence Day

भारत आज १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपला ७८ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. देशातील प्रत्येक नागरिक हा दिवस भव्यतेने आणि उत्साहाने साजरा आहे. त्यामध्ये कलाकारही मागे नाहीत. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या काही कलाकारांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील प्रगती बदल सांगितले आणि आपले देश प्रेम व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

शिवा मालिकेतील पूर्वा कौशिक

'शिवा' या मालिकेत शिवाची भूमिका पूर्वा कौशिक साकारत आहे. तिने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, "सर्वांना ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारताला आणखीन प्रगतीशील बनवण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे असं मला वाटत. जितकं लोक ज्ञान घेतील तितके पुढे जातील मग ते तांत्रिक ज्ञान, वाचन असो किंवा वेगळ्या प्रकारची विद्या आत्मसद करणे असो. भारतात शाळांमध्ये मला शिक्षण पद्धती आणखी सुधारलेली बघायला आवडेल. आज आपण स्वातंत्र्यदिनानिमित्त बोलत आहोत तर मला सांगायला आवडेल की मी फ्रीडम फायटर भगत सिंग यांच्यावर एक नाटक केलं होतं. मी नवीन पिढीला हेच सांगेन की नवीन गोष्ट आत्मसाद करणं सोडू नका. कारण आताची पिढी खूप फास्ट आहे. मला तितक जास्त ज्ञान नाही पण मला असं वाटत की इतक्या विशाल लोकसंख्येमध्ये आपण नवीन गोष्टी आत्मसाद करण्यात कमी पडतोय असं वाटतंय. एक बदल बघायला आवडेल तो म्हणजे शिक्षण पद्धती मध्ये, दुसरं म्हणजे स्त्री-पुरुष समानता आपण हे फक्त म्हणतो पण ते प्रत्यक्षात दिसत नाही. आज ही आपल्याकडे बोललं जातं की आरे तो करतोय ना, तो करणारच, तू काय करतेस, तर असं न होता दोघांना सामान नजरेने पाहिले पाहिजे" असे म्हटले आहे.

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील वल्लरी

" मला कळायला लागल्यापासून आपल्या देशात बदल पाहिले आहेत ते म्हणजे शाळा आणि शिक्षणपद्धती, हॉस्पिटल्स मेडिकल, इंफ्रास्टकचर मध्ये. हेच नाही तर आपल्या देशाच्या नागरिकांच्या विचारामध्ये ही प्रगती आली आहे. पण मला असं वाटत स्त्रियांना सामान वागणूक आणि स्वतंत्र मिळालंच पाहिजे मोट्या शहरात खूप प्रमाणात हे घडलंय पण अजूनही छोट्या शहरात आणि गावाकडे अजून त्यात तितकी प्रगती नाही. विचारांची क्रांती झाली की पूर्णपणे देश स्वतंत्र झालाय असे आपण म्हणू शकतो. पुढच्या पिढीला आणि सर्वानाच एकच सल्ला असेल की भारताचा इतिहास आणि ज्यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिलं त्यांना कधीच विसरू नका" असे 'नवरी मिळे हिटलरला' ची लीला म्हणजे वल्लरी विराज म्हणाली.

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतील शिवानी नाईक

'अप्पी आमची कलेक्टर' मधली अप्पी म्हणजेच शिवानी नाईक, " माझ्या लहानपणी स्वातंत्र्यदिन खूप गोड साजरा व्हायचा सकाळी शाळेत जाऊन आम्ही सर्वजण झेंडा वंदन करायचो. पण आता पुष्कळ बदल झालाय. काही लोक १५ ऑगस्ट एक सुट्टी म्हणून बघतात पण काही लोक आहेत जे स्वातंत्र्यदिनाचं महत्व समजून खरंच ह्या दिवशी देशासाठी काहीतरी चांगलं काम करतात. जग सध्या खूप पुढे चाललंय पण जर मला काही बदल घडवायचा असं सांगितलं तर किंवा कशात सुधारणा झालेली पाहायला आवडेल तर ते आहे जातिवाद. मला असं वाटतं की सगळे जण सामान आणि एकत्र राहून काय करता येऊ शकत ह्याच्या कडे लक्ष दिले तर गोष्टी खूप वेगळ्यारीतीने होतील आणि विचारांचा विकास होईल. पुढच्या पिढीला मी हाच सल्ला देईन की देशासाठी काहीतरी आपल्या पद्धतींनी करा. कारण आपल्यावर देश स्वातंत्र्य करण्याची जबाबदारी नाहीये, पण जे स्वातंत्र्य मिळालं आहे ते सांभाळणं आपली जबाबदारी आहे. त्याला सांभाळा, स्वच्छता ठेवा, शिस्तपाळा, एकजूट होऊन राहा जे तुमच्या हातात आहे त्या गोष्टी करा भारत देशाला पुढे नेण्यासाठी.”
वाचा: देशभक्तीवर आधारित ओटीटीवर असलेले 'हे' चित्रपट नक्की पाहा

'लाखात एक आमचा दादा' मधईल दिशा परदेशी

'लाखात एक आमचा दादा' ची तुळजा म्हणजेच दिशा परदेशी म्हणाली, "मी भारतात डिजिटल क्रांती पहिली. लँडलाईन पासून हायटेक मोबाईल फोन्स, कम्प्युटर पासून ते लॅपटॉप, कॅश ते डिजिटल मनी ह्यासगळ्या गोष्टी पाहिल्यात. 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेमुळे मला साताऱ्यातील एका छोट्या गावात काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मला शेतीची आवड निर्माण झाली. भारताचा शेतीमध्ये विकास झाला आहे यात शंका नाही पण मला शेतीत अधिक प्रगती पाहायला आवडेल आणि माझ्यामते तरुण पिढीला या विषयावर शिक्षित केले पाहिजे ज्याने देशाची ही प्रगती होईल. मी अभिनय क्षेत्रात आहे तर जर मला कधी संधी मिळाली तर सुभाष चंद्र बोस ह्यांच्या सैन्यदलातील महिला सैनिक सरस्वती राजमानी ह्याची भूमिका साकारायला आवडेल."