भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स सध्या अंतराळात अडकली आहे. आज १९ सप्टेंबर रोजी ती पृथ्वीपासून ४०० किलोमीटरवर अंतराळात आपला ५९ वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. वाढदिवशी सुनीता विल्यम्सला भारताकडून एक अनोखी भेट देण्यात आली आहे. प्रसिद्ध म्युझिक कंपनी सारेगामाने ही भेट दिली आहे. या गिफ्टमध्ये प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचे "बार बार दिन ये आये" या गाण्याचा वापर करण्यात आला आहे. काही संगीतकार, गायक आणि सेलिब्रिटींचा एक ग्रुप तयार केला असून ते हे गाणे गाताना दिसत आहेत.
सारेगामाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुनीला विल्यमला ५९व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओला, "चला भारतीयांनो, सुनीता विल्यम्सला वाढदिवसाच्या #HappyBirthdaySunita शुभेच्छा देऊया आणि तिला अंतराळात सामूहिक शुभेच्छा पाठवू या. आपले व्हिडीओ पोस्ट करा आणि @saregama_official टॅग करा" असे कॅप्शन दिले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक करण जोहर सर्वप्रथम सुनीता विल्यम्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. त्यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम, शान, हरिहरन आणि नीति मोहन यांनी मोहम्मद रफी यांचे 'बार बार दिन ये आये' हे गाणे गाऊन शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपले व्हिडिओ बनवून #HappyBirthdaySunita शेअर करावेत.
आणखी एका पोस्टमध्ये सारेगामाने या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकलेले ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर देखील दिसत आहेत. या गाण्याद्वारे ते आपल्या शैलीत सुनीताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. हा व्हिडीओ शेअर करत, ''फर्ज' चित्रपटाचा खरा स्टार जितेंद्र आपल्या खास अंदाजात शुभेच्छा देताना' असे कॅप्शन देण्यात आला आहे. आणखी एका व्हिडिओमध्ये शंकर महादेवन, अनुप जलोटा, सलीम मर्चंट, इला अरुण, हरिचरण शेषाद्री आणि श्रद्धा पंडित हे दिग्गज देखील आपापल्या स्टाईलमध्ये 'बार बार दिन ये आये' गाताना आणि सुनीता विल्यम्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

वाचा: प्रेक्षकांसाठी खुशखबर! ९९ रुपयांमध्ये पाहा मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, वाचा कधी आणि कुठे?
सुनीता विल्यम्स सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएससी) आहे. आज तिचा ५९वा वाढदिवस आहे. बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलच्या पहिल्या क्रू फ्लाइट टेस्ट (सीएफटी) मोहिमेचा एक भाग म्हणून ती बॅरी विल्मोरसह जूनमध्ये आयएसएसमध्ये पोहोचली होती. स्टारलाइनर कॅप्सूलवर अंतराळवीरांसह बोईंगचे हे पहिलेच अंतराळउड्डाण होते. ६ जून रोजी अंतराळ स्थानकावर परतण्यापूर्वी तिला थ्रस्टरची समस्या निर्माण झाली आणि हीलियमगळतीला सामोरे जावे लागले. त्यामुळे नासाचे हे दोन वैमानिक आता पुढील वर्षापर्यंत आयएसएसवरच राहणार आहेत.