सिनेरसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. खरं तर १५ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी चार सिनेमे रिलीज होणार आहेत. विशेष म्हणजे हे काही छोटे सिनेमे नाहीत, हे बॉलिवूडमधील सुपरस्टार्सचे सिनेमे आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकले या चित्रपटांमध्ये राजकुमार राव, अक्षय कुमार, संजय दत्त आणि जॉन अब्राहम या बॉलिवूडमधील बड्या कलाकारांचा समावेश आहे. आता हे चित्रपट कोणते चला जाणून घेऊया..
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री २' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. या चित्रपटात राजकुमार आणि श्रद्धाव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही भूमिका आहेत. पाहा या चित्रपटाचा ट्रेलर…
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. मुदस्सर अजीज दिग्दर्शित हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत तापसी पन्नू, वाणी कपूर, अपारशक्ती खुराना, अॅमी विर्क, आदित्य सील, प्रज्ञा जयस्वाल आणि फरदीन खान यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. पाहा या चित्रपटाचा ट्रेलर…
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा 'डबल इस्मार्ट' हा चित्रपट हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केलेला हा सायन्स फिक्शन अॅक्शन पट आहे. या चित्रपटात संजय दत्तसोबत काव्या थापर, बानी जे, अली, गेटप श्रीनू, सयाजी शिंदे, मकरंद देशपांडे आणि टेम्पर वामसी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'आयस्मार्ट' चित्रपटाचा हा सिक्वल आहे.
अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री शर्वरी बाग अभिनीत 'वेदा' या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणीने केले आहे. या चित्रपटात जॉन आणि शर्वरी व्यतिरिक्त तमन्ना भाटियादेखील दिसणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने पाहात आहेत.
येत्या १५ ऑगस्टला एक दोन नाही तर तब्बल चार चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. आता कोणता चित्रपट पाहायचा असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.