Independence Day: कुणी म्हणतंय शिक्षण पद्धती बदला, तर कुणी म्हणतंय विचार! स्वातंत्र्यदिनानिमित्त कलाकारांचे विचार काय?-independence day 2024 what are the thoughts of marathi serial artists on independence day ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Independence Day: कुणी म्हणतंय शिक्षण पद्धती बदला, तर कुणी म्हणतंय विचार! स्वातंत्र्यदिनानिमित्त कलाकारांचे विचार काय?

Independence Day: कुणी म्हणतंय शिक्षण पद्धती बदला, तर कुणी म्हणतंय विचार! स्वातंत्र्यदिनानिमित्त कलाकारांचे विचार काय?

Aug 15, 2024 05:22 PM IST

Independence Day 2024: आपल्या आवडत्या मालिकांच्या कलाकारांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाच्या प्रगतीबद्दल सांगितले आणि आपले देश प्रेम व्यक्त केले आहे.

Independence Day 2024 marathi celebrities
Independence Day 2024 marathi celebrities

Independence Day 2024: भारत देश १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपला ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील प्रत्येक नागरिक हा दिवस भव्यतेने आणि उत्साहाने साजरा करतो. याच खास निमित्ताने ‘झी मराठी’च्या कलाकारांनी देखील स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील प्रगतीबद्दल सांगितले आणि आपले देश प्रेम व्यक्त केले आहे.

नवीन गोष्टी शिकणं सोडू नका!

शिवा’ मालिकेतील शिवा म्हणजे अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणते की, ‘सर्वांना ७८व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारताला आणखीन प्रगतीशील बनवण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे असं मला वाटतं. जितकं लोक ज्ञान घेतील, तितके पुढे जातील. मग ते तांत्रिक ज्ञान, वाचन असो किंवा वेगळ्या प्रकारची विद्या आत्मसाद करणे असो. भारतातील शाळांमध्ये मला शिक्षण पद्धती आणखी सुधारलेली बघायला आवडेल. आज आपण स्वातंत्र्यदिनानिमित्त बोलत आहोत, तर मला सांगायला आवडेल की, मी शहीद भगत सिंह यांच्यावर एक नाटक केलं होतं. या पिढीला हेच सांगेन की, नवीन गोष्ट आत्मसाद करणं सोडू नका. कारण आताची पिढी खूप फास्ट आहे. मला तितकं जास्त ज्ञान नाही. पण, मला असं वाटत की, इतक्या विशाल लोकसंख्येमध्ये आपण नवीन गोष्टी आत्मसाद करण्यात कमी पडतोय. या काळात बघायला आवडेल तो म्हणजे एक शिक्षण पद्धतीमध्ये, दुसरं म्हणजे स्त्री-पुरुष समानता. आपण हे फक्त म्हणतो. पण, ते प्रत्यक्षात दिसत नाही.’

जातीवाद विसरून एकत्र या!

'अप्पी आमची कलेक्टर' मधली अप्पी म्हणजेच अभिनेत्री शिवानी नाईक म्हणते की,‘माझ्या लहानपणी स्वातंत्र्यदिन खूप गोड साजरा व्हायचा. सकाळी शाळेत जाऊन आम्ही सर्वजण झेंडा वंदन करायचो. पण, आता पुष्कळ बदल झालाय. काही लोक १५ ऑगस्ट एक सुट्टी म्हणून बघतात. पण, काही लोक आहेत, जे स्वातंत्र्यदिनाचं महत्व समजून खरंच या दिवशी देशासाठी काहीतरी चांगलं काम करतात. जग सध्या खूप पुढे चाललंय. पण, जर मला काही बदल घडवायचा असं सांगितलं तर किंवा कशात सुधारणा झालेली पाहायला आवडेल, तर तो आहे जातीवाद. मला असं वाटतं की, सगळे जण सामान आणि एकत्र राहून, काय करता येऊ शकत याच्याकडे लक्ष दिले, तर गोष्टी खूप वेगळ्यारीतीने होतील आणि विचारांचा विकास होईल. पुढच्या पिढीला मी हाच सल्ला देईन की, देशासाठी काहीतरी आपल्या पद्धतींनी करा. कारण आपल्यावर देश स्वातंत्र्य करण्याची जबाबदारी नाहीये, पण जे स्वातंत्र्य मिळालं आहे ते सांभाळणं आपली जबाबदारी आहे. त्याला सांभाळा, स्वच्छता ठेवा, शिस्तपाळा, एकजूट होऊन राहा. जे तुमच्या हातात आहे, त्या गोष्टी भारत देशाला पुढे नेण्यासाठी करा.’

बदल घडण्याची वाट पाहू नका. जबाबदारी घ्या आणि बदल घडवा!

'पुन्हा कर्तव्य आहे' मधला आकाश म्हणजे अक्षय म्हात्रे म्हणतो की, ‘भारतात माझ्या डोळ्यासमोर मी जे बदल पाहिले आहेत, ते म्हणजे इंफ्रास्टकचरमध्ये विकास झाला आहे. माझ्या लहानपणी आमच्या घराच्या जवळ एकही मॉल नव्हता. पण, आता तीन मॉल आहेत, त्यासोबत मोठमोठे टॉवर, हायवेमध्ये विकास होताना पहिला आहे. मला जर आणखीन काही गोष्टींची प्रगती झालेली पाहायला आवडेल, ते म्हणजे रोजगार आणि व्यवसाय विभाग. आपल्या देशात व्यपार करणारे लोक अधिक वाढले पाहिजेत, ज्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होईल. स्वातंत्र्यदिनानिमित्त मला सांगायला आवडेल की, जेव्हापासून सिनेमा पाहायला लागलो भगत सिंह आणि चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तिमत्वाने मला प्रेरणा दिली आहे. जर मला कधी संधी मिळाली, तर या भूमिका साकारायला आवडेल. पुढच्या पिढीला एकच सल्ला आहे की, बदल घडवा, जागरूक राहा, जबाबदार रहा, मतदान करा, बदल घडण्याची वाट पाहू नका. जबाबदारी घ्या आणि बदल घडवा.’

Tharala Tar Mag: प्रतिमाच्या स्मृती परत आणण्यासाठी सायलीला मिळाली आयडिया; आता प्रियाचं बिंग फुटणार?

संस्कृती परंपरांना जोडून हा देश पुढे न्या!

'लाखात एक आमचा दादा'ची तुळजा म्हणजेच दिशा परदेशी म्हणते की,‘मी भारतात डिजिटल क्रांती पहिली. लँडलाईनपासून हायटेक मोबाईल फोन्स, कॉम्प्युटरपासून ते लॅपटॉप, कॅश ते डिजिटल मनी यासगळ्या गोष्टी पाहिल्यात.'लाखात एक आमचा दादा' या मालिकेमुळे मला साताऱ्यातील एका छोट्या गावात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला शेतीची आवड निर्माण झाली. भारताचा शेतीमध्ये विकास झाला आहे, यात शंका नाही. पण, मला शेतीत अधिक प्रगती पाहायला आवडेल आणि माझ्यामते तरुण पिढीला या विषयावर शिक्षित केले पाहिजे. ज्याने देशाचीही प्रगती होईल. मी अभिनय क्षेत्रात आहे, तर मला कधी संधी मिळाली तर सुभाष चंद्र बोस यांच्या सैन्यदलातील महिला सैनिक सरस्वती राजमानी यांची भूमिका साकारायला आवडेल. जेव्हा मी सुभाष चंद्र बोस यांचे पुस्तक वाचत होते, तेव्हा त्यांचा उल्लेख वारंवार होता आणि मला खूप कौतुक वाटलं. त्यांनी देशासाठी काय-काय केले आहे आणि एक महिलेने कशी क्रांती घडवली ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवायला आवडेल. पुढच्या पिढीला मी एकच सल्ला देईन की, आपल्या संस्कृती परंपरांना जोडून हा देश पुढे नेला पाहिजे. नवीन गोष्टी तर शिकल्याच पाहिजेच, पण आपल्या मुळांना विसरू नका.’

विचारांची क्रांती झाली पाहिजे!

'नवरी मिळे हिटलरला'ची लीला म्हणजे अभिनेत्री वल्लरी विराज म्हणते की, ‘मला कळायला लागल्यापासून आपल्या देशात बदल पाहिले आहेत, ते म्हणजे शाळा आणि शिक्षणपद्धती, हॉस्पिटल्स मेडिकल, इंफ्रास्टकचरमध्ये. हेच नाही तर आपल्या देशाच्या नागरिकांच्या विचारांमध्येही प्रगती आली आहे. पण, मला असं वाटतं स्त्रियांना सामान वागणूक आणि स्वतंत्र मिळालंच पाहिजे. मोठ्या शहरांत खूप प्रमाणात हे घडलंय. पण, अजूनही छोट्या शहरात आणि गावाकडे अजून त्यात तितकी प्रगती नाही. विचारांची क्रांती झाली की, पूर्णपणे देश स्वतंत्र झालाय असे आपण म्हणू शकतो. पुढच्या पिढीला आणि सर्वांनाच एकच सल्ला असेल की, भारताचा इतिहास आणि ज्यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिलं त्यांना कधीच विसरू नका.’