मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shahrukh khan : टीम इंडिया हरली, पण शाहरुख खानच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली! पाहा viral video

Shahrukh khan : टीम इंडिया हरली, पण शाहरुख खानच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली! पाहा viral video

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 20, 2023 06:58 PM IST

shahrukh khan asha bhosle viral video : सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख आशा भोसले यांना मदत करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनी कौतुक केले आहे.

SRK picks up cup for Asha Bhosle
SRK picks up cup for Asha Bhosle

shahrukh khan at narendra modi stadium: क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आहे. अशाप्रकारे भारतीय संघाचे तिसऱ्यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. पण टीम इंडियाच्या पराभवाचे दु:ख सर्वांनाच आहे. दरम्यान, सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी शाहरुखचे कौतुक केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनल पाहण्यासाठी अनेक दिग्गज लोक हे अहमदाबाद येथील नरेंद्रमोदी स्टेडीयमला पोहोचले होते. प्रसिद्ध गायिका आशा भोसले देखील तेथे हजर असल्याचे पाहायला मिळाले. आशा भोसले यांच्यासोबत शाहरुख खान बसला होता. अशा भोसले यांनी चहा घेतल्यानंतर त्यांची कपबशी शाहरुखने उचलून ठेवली. शाहरुखचे हे वागणे पाहून सर्वांनी कौतुक केले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: ललित मोदी, वसिम अक्रम ते अंबानी; ‘या’ प्रतिष्ठित व्यक्तींशी जोडलं गेलेलं सुश्मिता सेनचे नाव

शाहरुखचा हा व्हिडीओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी 'मी #INDvsAUS फायनलमध्ये पाहिलेले एकमेव हृदयस्पर्शी दृश्य' असे कॅप्शन दिले. सध्या सोशल मीडियावर हर्ष यांनी शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

वर्ल्डकपमध्ये कोहलीची कामगिरी

कोहलीने या विश्वचषकातील ११ सामन्यांच्या ११ डावांमध्ये ९५.६२ च्या सरासरीने ७६५ धावा केल्या. या स्पर्धेत कोहलीने ३ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली. ४८ वर्षांच्या वर्ल्डकप इतिहासात कोहली एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. कोहलीला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवडण्यात आले. ऐतिहासिक कामगिरी करुनही वर्ल्डकप हारल्याचे दु:ख कोहलीच्या चेहऱ्यावर दिसत होते.

WhatsApp channel