क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आहे. अशाप्रकारे भारतीय संघाचे तिसऱ्यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिमयवर खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी अनेक कलाकार देखील उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखने रणवीरकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अनेक कलाकार वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. तेथे दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह उपस्थित होते. दीपिकाने जेव्हा शाहरुख खानला तेथे येताना पाहिले तेव्हा दीपिका त्याच्या जवळ गेली आणि त्याला मिठी मारली. त्यापाठोपाठ रणवीर तेथे गेला. शाहरुख रणवीरला केवळ हाय बोलला आणि मिठी न मारताच तेथून निघून गेला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा: विराटला अश्रू अनावर, अनुष्कानं सावरलं! भावनिक करणारा क्षण पाहा
शाहरुखच्या अशा वागण्याचे कारण डॉन हा चित्रपट असावा असे निष्कर्ष नेटकऱ्यांनी लावला आहे. कारण डॉन या चित्रपटात शाहरुख ऐवजी रणवीरला घेण्यात आले आहे. त्यासोबतच रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटातसाठी देखील शाहरुख पहिली पसंती होता. मात्र, काही कारणास्तव शाहरुख ऐवजी रणवीरला चित्रपटात घेण्यात आले. त्यामुळे शाहरुख असे वागला असावा असे नेटकरी म्हणत आहेत.
कोहलीने या विश्वचषकातील ११ सामन्यांच्या ११ डावांमध्ये ९५.६२ च्या सरासरीने ७६५ धावा केल्या. या स्पर्धेत कोहलीने ३ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली. ४८ वर्षांच्या वर्ल्डकप इतिहासात कोहली एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. कोहलीला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवडण्यात आले. ऐतिहासिक कामगिरी करुनही वर्ल्डकप हारल्याचे दु:ख कोहलीच्या चेहऱ्यावर दिसत होते.