Kala Ghoda festival: "काला घोडा फेस्टिवल"मध्ये होणार मराठीचा जागर, दाखवण्यात येणार 'हे' नाटक
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kala Ghoda festival: "काला घोडा फेस्टिवल"मध्ये होणार मराठीचा जागर, दाखवण्यात येणार 'हे' नाटक

Kala Ghoda festival: "काला घोडा फेस्टिवल"मध्ये होणार मराठीचा जागर, दाखवण्यात येणार 'हे' नाटक

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 19, 2024 10:03 AM IST

Kala Ghoda art festival 2024: यंदाच्या काला घोडा फेस्टिवलच्या शुभारंभाच्या दिवशी म्हणजेच २० जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Kala Ghoda festival
Kala Ghoda festival

Kala Ghoda art festival 2024: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळावा याचं अचूक उत्तर देणारा आणि मराठी भाषेची श्रीमंती दर्शविणारा एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तुम्हाला ऐकून नवल वाटेल पण यंदाच्या काला घोडा फेस्टिवलची सुरुवात ही एका मराठी नाटकाने होणार आहे. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले. आता हे नाटक कोणते? कुठे सादर होणार? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्यासाठी ही बातमी नक्की वाचा...

नाटक नृत्य संगीताच्या माध्यमातून दोन हजार वर्षांचा प्रवास मनोरंजनाच्या माध्यमातून उलगडत जाणारी "मधुरव बोरु ते ब्लॉग" ही कलाकृती यंदाच्या काला घोडा फेस्टिवलच्या शुभारंभाच्या दिवशी म्हणजेच २० जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी सात वाजता वाय बी चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट इथे सादर होणार आहे. आता "मधुरव बोरु ते ब्लॉग" पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: टांझानियाच्या किली पॉलचा मराठमोळा अंदाज, "मावळ आम्ही वादळ आम्ही" गाण्यावरील Video Viral

"मराठी असे आमुची मायबोली आम्ही मराठीतच बोलणार" असे म्हणणाऱ्यांपासून "मराठी आहोत हे सांगायला लाज वाटते" असे सांगणाऱ्या नव्या पिढीपर्यंत प्रत्येकाने पाहायलाच हवा असा हा कार्यक्रम. ‘राजभवन‘, ‘गेटवे ऑफ इंडिया‘,‘महाराष्ट्र सदन‘, ‘रॉयल ऑपेरा हाऊस‘ अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये प्रयोग झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काला घोडा फेस्टिवल मध्ये याचा प्रयोग होणे ही गौरवाची गोष्ट आहे.

डॉक्टर समीरा गुजर लिखित मधुरा वेलणकर साटम दिग्दर्शित "मधुरव बोरू ते ब्लॉग" या कार्यक्रमाचे संगीत श्रीनाथ म्हात्रे नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे प्रकाशयोजना शितल तळपदे आणि नेपथ्य प्रदीप पाटील यांचे असून मधुरा वेलणकर साटम आकांक्षा गाडे आणि आशिष गाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही गाजत असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वजण आता उत्सुक आहेत.

Whats_app_banner