बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान 'जाने तू या जाने ना' या चित्रपटानंतर लोकप्रिय ठरला. त्याने बॉलिवूडमधील काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलेल आहे. २०११मध्ये त्याने अवंतिका मलिकशी थाटामाटात लग्न केले होते. पण आता सतत होणाऱ्या भांडणांमुळे दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. अवंतिकाला इम्रानला आणखी एक संधी द्यायची होती. त्यासाठी ती प्रयत्न करत होती. पण इम्रान पुन्हा एकत्र येण्यास तयार नसल्याचे म्हटले जात आहे.
इम्रानने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो इतर गोष्टींकडे लक्ष देणे टाळत आहे. पण अवंतिका इम्रानला दुसरी संधी देऊ इच्छिते. 'ईटाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही विभक्त झाले आहेत. पण दोघांनीही घटस्फोटाचा अर्ज कोर्टात केलेला नाही.
इम्रान आणि अवंतिकाने २०११ रोजी लग्न केले. त्यांना सात वर्षांची मुलगी आहे. विभक्त झाल्यानंतर ते गेल्या वर्षी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एका लग्नात एकमेकांसमोर आले होते. २०१९मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इम्रान त्याच्या निर्णयावर ठाम आहे.
संबंधित बातम्या