'हा' अभिनेता गर्लफ्रेंडसोबत राहातो करण जोहरच्या घरात, महिन्याचे भाडे ऐकून बसेल धक्का
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'हा' अभिनेता गर्लफ्रेंडसोबत राहातो करण जोहरच्या घरात, महिन्याचे भाडे ऐकून बसेल धक्का

'हा' अभिनेता गर्लफ्रेंडसोबत राहातो करण जोहरच्या घरात, महिन्याचे भाडे ऐकून बसेल धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Mar 30, 2024 10:55 AM IST

बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने त्याचे वांद्रे येथील घर भाडेतत्वावर दिले आहे. या घराच्या एका महिन्याच्या भाड्यात तुम्ही १५ दिवस परदेशात ट्रीप करु शकता.

'हा' अभिनेता गर्लफ्रेंडसोबत राहातो करण जोहरच्या घरात, महिन्याचे भाडे ऐकून बसेल धक्का
'हा' अभिनेता गर्लफ्रेंडसोबत राहातो करण जोहरच्या घरात, महिन्याचे भाडे ऐकून बसेल धक्का

बॉलिवूड कलाकारांचे लग्झरी आयुष्य हे कायमच चर्चेत असते. सध्या दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता करण जोहर चर्चेत आहे. त्याने वांद्रे येथील एक अपार्टेमेंट भाडे तत्त्वावर दिली आहे. या घरात बॉलिवूडमधील एक कलाकार राहतो. तो महिन्याला मोजत असलेले भाडे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

करण जोहरच्या घरात राहणारा हा अभिनेता दुसरातिसरा कोणी नसून आमिर खानचा पुतण्या, अभिनेता इम्रान खान आहे. काही दिवसांपूर्वीच इम्रानने पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर आता तो गर्लफ्रेंड रेखा वॉशिंग्टनसोबत करण जोहरच्या वांद्रे येथील घरात शिफ्ट झाला आहे. करणच्या या घराच्या महिन्याच्या भाड्याची सध्या चर्चा रंगली आहे. 'मनीकंट्रोल डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान आणि लेखा हे आता करण जोहरच्या राहात असलेल्या घराचे भाडे जवळपास ९ लाख रुपये आहे. त्यांचे हे घर कार्टर रोडवरील क्लिफपेट येथील तीन मजली अपार्टमेंट येथे आहे.
वाचा: 'नमस्कार वहिनी', फोटोग्राफर्सने आवाज देताच आलियाने दिली अशी प्रतिक्रिया

इम्रान गेल्या काही दिवसांपासून वांद्रे येथील पाली हिल्स परिसरातील त्याच्या बंगल्यामध्ये राहात होता. त्याचा हा बंगला समुद्र किनाऱ्याजवळ आहे. लेखान जेव्हा करण जोहरे घर भाडेतत्वावर घेतले तेव्हा इम्रान या घरात शिफ्ट झाला. यापूर्वी इम्रानचा मामा, काका आमिर खान यांनी देखील याच बिल्डींगमध्ये अपार्टमेंट भाडे तत्त्वावर घेतली होती.
वाचा: ओंकार भोजने दिसणार महेश मांजरेकरांसोबत, सिनेमाच्या पोस्टने वाढवली उत्सुकता

रिअल इस्टेट डेटाबेस प्लॅटफॉर्म Zapkeyवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सलमान खान, शाहरुख खान, जॉन अब्राहम, सचिन तेंडुलकर आणि इतरही काही कलाकारांना वांद्रे येथील परिसर आवडतो. त्यामुळे कलाकारांचा वांद्रे येथे घर घेण्याकडे जास्त कल असल्याचे म्हटले जाते.
वाचा: कसा आहे करीना आणि तब्बूचा 'क्रू' सिनेमा? वाचा रिव्ह्यू

कोण आहे लेखा वॉशिंगटन

लेखाचे पहिले लग्न झाले आहे. तिने पत्रकार पाब्लो चॅटर्जी यांच्याशी लग्न केले होते. ते प्रसिद्ध थिएटर आर्टिस्ट धृतिमान चॅर्टजी यांचा मुलगा आहेत. पण लेखा आणि पाब्लो यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता ती इम्रानसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. इम्रानने २०१९मध्ये पत्नी अवंतिका मलिकला घटस्फोट दिला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिने लेखाविषयी सर्वांना माहिती दिली. आता ते दोघे एकत्र राहणार असल्याचे समोर आले आहे.

Whats_app_banner