
Ileana Dcruz Boyfriend Photo: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. १८ एप्रिल रोजी तिने बेबी बंपचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली होती. इलियानाने प्रेग्नेंसी जाहीर केल्यानंतर अनेकांनी तिला बाळाच्या बाबाचे नाव विचारले होते. मात्र, तीन महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही तिने हे नाव गुलदस्त्यात ठेवले होते. तिने सगळ्याच चाहत्यांशी उत्सुकता ताणली होती. दरम्यान तिने अनेकदा त्याची अस्पष्ट झलक चाहत्यांना दाखवली होती. मात्र, आता तिने आपल्या बॉयफ्रेंडचा म्हणजेच आपल्या होणाऱ्या बाळाच्या बाबांचा चेहरा सगळ्यांना दाखवला आहे.
इलियाना डिक्रूझने तिच्या बॉयफ्रेंडचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा स्पष्ट दिसला आहे. फोटोमध्ये इलियाना तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेट नाईट साजरी करताना दिसत आहे. दोघेही यावेळी खूप आनंदी दिसत आहे. या फोटोसोबत इलियानाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'डेट नाईट'. यातील पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रूझ त्यांच्या खांद्यावर डोके ठेवताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोत ते एकमेकांच्या डोळ्यात बघत आहेत. तिसऱ्या फोटोत त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी इलियाना, अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या भावासोबत सुट्ट्या साजरी करताना दिसली होती. दोघांचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या रिलेशनशिपचा कयास बांधला होता. मात्र, त्या दोघांनी आपल्यात केवळ मैत्री असल्याचे म्हटले होते. यानंतर आता इलियानाने तिच्या बॉयफ्रेंडचे फोटो शेअर केल्यानंतर ही व्यक्ती कतरिनाचा भाऊ नसल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्यावर्षी कतरिनाच्या सिक्रेट बर्थडे पार्टीतही इलियाना दिसली होती. यामुळेच अफवांना हवा मिळाली होती.
काही दिवसांपूर्वीच इलियानाने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक अस्पष्ट फोटो शेअर केला होता आणि चाहत्यांची उत्सुकता ताणली होती. मात्र, आता तिने बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत सगळ्यांनाच आपल्या होणाऱ्या बलाचा बाबा दाखवला आहे. बॉयफ्रेंडचे कौतुक करताना इलियानाने लिहिले खास पोस्ट देखील लिहिली आहे. तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत करत आहे.
संबंधित बातम्या
