Govida Firing Case: गोविंदाची थेअरी पोलिसांना पटेना; बंदूक जमिनीवर पडली तर गोळी पायाला कशी लागली? चौकशी होणार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Govida Firing Case: गोविंदाची थेअरी पोलिसांना पटेना; बंदूक जमिनीवर पडली तर गोळी पायाला कशी लागली? चौकशी होणार

Govida Firing Case: गोविंदाची थेअरी पोलिसांना पटेना; बंदूक जमिनीवर पडली तर गोळी पायाला कशी लागली? चौकशी होणार

Published Oct 02, 2024 07:04 PM IST

Govinda Bullet Firing Case: गोविंदा काही महत्त्वाची माहिती लपवत आहे, असे पोलिसांना वाटत आहे. अभिनेत्याने घटनास्थळी घडलेल्या गोष्टींबद्दल नीट माहिती न दिल्याने पोलिसांचे संशय वाढले आहेत.

Govinda
Govinda

Govinda Bullet Firing Case: मंगळवारी सकाळी झालेल्या एक विचित्र अपघातात प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याच्या पायाला चुकून गोळी लागली. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, आणि त्याला सामान्य वॉर्डात हलवण्यात येणार आहे, अशी माहिती त्याच्या पत्नी सुनीता आहुजा यांनी दिली. डॉक्टरांच्या मते, गोविंदाला दोन ते तीन दिवसांत घरी जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पण, गोविंदाला किमान ३-४ आठवड्यांची विश्रांती घेणे आवश्यक असल्याचेही डॉक्टरांनी म्हटले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गोविंदाच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः, गोविंदाची मुलगी टीना हिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तथापि, गोविंदाच्या सुरुवातीच्या वक्तव्यावर पोलीसांचे समाधान झालेले नाही. पोलिसांच्या मते, रिव्हॉल्व्हर जमिनीवर पडल्यावर गोळीबार कसा काय झाला? हा एक मोठा प्रश्न आहे.

पोलिसांचे असे म्हणणे आहे की, पडल्यानंतर रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर खेचला गेला असल्यास गोळीबार होण्याची शक्यता कमी असते. बंदूक जमिनीवर पडली तर गोळी गुडघ्या जवळ म्हणजे वरच्या बाजूस कशी लागली? त्यामुळे, गोविंदाने उभे राहून आणि हातात रिव्हॉल्व्हर असताना त्यातून केला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, गोविंदा काही लपवण्याचा प्रयत्न करत आहे का, हे तपासण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

गोविंदाच्या जबाबात विसंगती

पोलिसांनी गोविंदाच्या प्राथमिक जबाबात काही विसंगती आढळल्यामुळे पुन्हा एकदा त्याची चौकशी करण्यात येणार आहे. गोविंदाने सांगितले की, अपघाताच्या वेळी रिव्हॉल्व्हरमध्ये ६ गोळ्या होत्या, त्यापैकी एक गोळी बंदुकीतून सुटली. आता जर गोविंदा रिव्हॉल्व्हर घरातच ठेवणार होता, तर ती बंदूक लोडेड का होती? त्यातील गोळ्या काढून का ठेवण्यात आल्या नव्हत्या? आणि अभिनेता बाहेर जात होता तर त्याने सकाळी का बंदूक बाहेर काढली? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गोविंदा काही महत्त्वाची माहिती लपवत आहे, असे पोलिसांना वाटत आहे. गोविंदाने घटनास्थळी घडलेल्या गोष्टींबद्दल नीट माहिती न दिल्याने पोलिसांचे संशय वाढले आहेत.

Govinda Injured : स्वत:च्या रिव्हॉल्वरची गोळी लागून अभिनेता गोविंदा जखमी; नेमकं काय घडलं?

पोलिसांनी घटनास्थळाच्या पंचनाम्याद्वारे महत्त्वाच्या खुलाशांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. बॅलेस्टिक अहवालावरून गोळीच्या दिशेचा आणि अंतराचा शोध लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यामध्ये तज्ज्ञांचा सुद्धा समावेश आहे, जे या प्रकरणाचा सखोल तपास करतील.

पुन्हा चौकशी होणार

या संदर्भात पोलीस पुन्हा एकदा गोविंदाचा जबाब नोंदवणार आहेत. गोविंदाच्या मनातील गोंधळ आणि परिस्थितीने वाढवलेला ताण यामुळे, पोलिसांच्या तपासात थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. गोविंदाच्या गोळीबार प्रकरणात अनेक प्रश्न आणि अनुत्तरित गूढता शिल्लक आहे, ज्यावर पोलिसांना योग्य उत्तर मिळवण्याची गरज आहे. आता पोलीस पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

Whats_app_banner