ic 814 kandahar hijacking: पाकिस्तानी आतंकवाद्यांना दिली हिंदू नावं! सरकारनं फटकारल्यानंतर नेटफ्लिक्सनं घेतलं नमतं!-ic 814 kandahar hijacking netflix controversy will conduct content review netflix told government in meeting ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ic 814 kandahar hijacking: पाकिस्तानी आतंकवाद्यांना दिली हिंदू नावं! सरकारनं फटकारल्यानंतर नेटफ्लिक्सनं घेतलं नमतं!

ic 814 kandahar hijacking: पाकिस्तानी आतंकवाद्यांना दिली हिंदू नावं! सरकारनं फटकारल्यानंतर नेटफ्लिक्सनं घेतलं नमतं!

Sep 03, 2024 04:45 PM IST

ic 814kandahar hijacking Netflix Controversy: या वेब सीरिजमधील काही नावांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे सरकारने देखील नेटफ्लिक्सला फटकारलं आहे.

ic 814 kandahar hijacking: पाकिस्तानी आतंकवाद्यांना दिली हिंदू नावं!
ic 814 kandahar hijacking: पाकिस्तानी आतंकवाद्यांना दिली हिंदू नावं!

ic 814kandahar hijacking Netflix: सध्या सोशल मीडियासोबतच सगळीकडेच ‘आयसी ८१४:कंदहार हायजॅक’ या वेब सीरिजची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या वेब सीरिजमधील काही नावांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे सरकारने देखील नेटफ्लिक्सला फटकारलं आहे. या वेब सीरिजच्या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, सरकारच्यावतीनेनेटफ्लिक्स कंटेंट हेडसोबत एक बैठक घेण्यात आली. ‘या देशातील जनतेच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही,’असे सरकारने या बैठकीत म्हटले आहे. ‘भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा नेहमीच आदर केला पाहिजे. कोणतीही गोष्ट चुकीची मांडण्याआधी विचार करायला हवा. सरकार याकडे गांभीर्याने पाहत आहे’, असे देखील कडक शब्दात सांगितल्यानंतर आता नेटफ्लिक्सने देखील उत्तर दिले आहे.

माहिती प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि नेटफ्लिक्स कंटेंट हेड यांच्यात सुरू असलेली बैठक संपली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सने सरकारला आश्वासन दिले आहे की, भारतातील लोकांच्या भावना लक्षात घेऊन प्लॅटफॉर्मवर सामग्री अपलोड केली जाईल.शास्त्री भवनातील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांच्या कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली होती. नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल आणि दोन वरिष्ठ अधिकारी यात सहभागी झाले होते. या बैठकीला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजूही उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत‘आयसी ८१४’ वेब सीरिजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटबाबत विशेष चर्चा झाली.

नेमका वाद का?

‘आयसी ८१४:कंदहार हायजॅक’ या वेब सीरिजमध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटना हरकत-उल-मुजाहिदीनने इंडियन एअरलाईन्सच्या फ्लाईट क्रमांकआयसी ८१४चे अपहरण केले होते. या सीरिजमध्ये दोन अपहरणकर्त्यांना त्यांच्या हिंदू सांकेतिक नावानेच संबोधले जाते. यावरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. या सीरिजमध्ये चुकीची तथ्ये दाखवल्याचा लोक निषेध करत आहेत आणि सीरिजवर बंदी घालण्याची मागणीही करत आहेत.

नेटफ्लिक्सची ही वेब सीरिज १९९९मध्ये झालेल्या विमान अपहरणावर आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये अपहरणकर्त्यांना चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर अशी सांकेतिक नावे दिल्याचे दाखवण्यात आले आहे. यातील मोठा वाद ‘भोला’ आणि ‘शंकर’ या नावांच्या वापरावरून सुरू झाला आहे. पाचही अपहरणकर्ते मुस्लिम दहशतवादी होते आणि त्यापैकी दोघांनी हिंदू नाव का वापरले होते, हे या शोने अधोरेखित करायला हवे होते, असे म्हणत लोकांनी मालिकेचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

विभाग