Nitish And Smita Bharadwaj Case: ‘महाभारत’ फेम ‘श्रीकृष्ण’ अर्थात नितीश भारद्वाज यांनी काही दिवसांपूर्वीच पत्नी आपला मानसिक छळ करत असल्याची तक्रार दाखल केली होती. यामुळे ते प्रचंड चर्चेत आले होते. आता त्यांची पत्नी आयएएस अधिकारी स्मिता भारद्वाज यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पत्नी स्मिता आपला मानसिक छळ करत आहे, आपल्या मुलींना भेटू देत नाही आणि तिने त्यांना किडनॅप केले आहे, असे आरोप नितीश भारद्वाज यांनी केले होते. मात्र, आता हे आरोप फेटाळून लावत स्मिता यांनी म्हटले की, नितीश भारद्वाज त्यांच्या मुलींच्या संपर्कात आहेत आणि लँडलाइन फोनद्वारे ते नेहमीच एकमेकांशी बोलतात. दोघांचा हा खटला सध्या फॅमिली कोर्टात सुरू आहे.
अभिनेते नितीश भारद्वाज यांच्या पत्नी स्मिता भारद्वाज या भोपाळमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सोमवारी नितीश यांच्या आरोपांविरोधात निवेदन जारी केले आहे. नितीश यांनी ११ फेब्रुवारीला केलेली पोलिस तक्रार आणि १४ तारखेला भोपाळ येथील पत्रकार परिषदेत ते जे काही बोलले, ते निराधार असल्याचे या निवेदनात म्हटले गेले आहे.
स्मिता म्हणाल्या, ‘मी आमच्या अल्पवयीन जुळ्या मुलींचे अपहरण करून त्यांच्याशी नितीश यांचा संपर्क तोडल्याचा त्यांचा दावा पूर्णपणे निराधार आहे. नितीश भारद्वाज यांनी १७ फेब्रुवारी आणि २ जानेवारीला पुण्यात येऊन मुलींची भेट घेतली होती. २०२२पासून ते लँडलाईन फोनद्वारे मुलींच्या सतत संपर्कात आहे. नितीश यांनी कौटुंबिक न्यायालयातही बोलताना सांगितले होते की, त्यांचे लँडलाईन नंबरवर मुलींशी बोलले होते’, असे स्मिता यांनी म्हटले.
स्मिता भारद्वाज यांच्या निवेदनात असे लिहिले आहे की, ‘१७ फेब्रुवारी रोजी नितीश आपल्या काही कौटुंबिक मित्र आणि पोलीस अधिकाऱ्यांसह मुलींसह भेटले होते. त्यांची भेट ३० मिनिटांची होती. मात्र, त्यानंतर मुलींच्या डोळ्यात अश्रू होते. या भेटीमुळे मुलींना मानसिक त्रास झाला. तेव्हापासून त्या सतत रडत आहेत. मुलींनी नितीश हे देखील सांगितले आहे की, त्यांनी मीडियामध्ये आपल्याविषयी बोलू नये, यामुळे आपल्याला त्रास होतो. कोणत्याही मुलांना त्यांच्या पालकांमधील भांडण अशा सार्वजनिक झालेले पाहायचे नसते.’ आता असे म्हणत स्मिता भारद्वाज यांनी पती नितीश भारद्वाज यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.