अमिताभ यांनी प्रशंसा केलेल्या 'आय वॉन्ट टू टॉक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अमिताभ यांनी प्रशंसा केलेल्या 'आय वॉन्ट टू टॉक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली?

अमिताभ यांनी प्रशंसा केलेल्या 'आय वॉन्ट टू टॉक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली?

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 23, 2024 07:42 AM IST

I Want To Talk box office collection day 1: सत्य घटनेवर आधारित असलेल्या अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? चला जाणून घेऊया...

I Want To Talk box office collection
I Want To Talk box office collection

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. अखेर २२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता पहिल्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. नुकताच या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. चला जाणून घेऊया अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई...

शुजित सरकार दिग्दर्शित 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगलं केलं नाही. Sacnilk.com दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी या चित्रपटाने एक कोटींपेक्षा कमी कमाई केली. रायझिंग सन फिल्म्स आणि किनो वर्क्स निर्मित हा चित्रपट २२ नोव्हेंबररोजी जगभरात प्रदर्शित झाला.

चित्रपटाने पहिल्या दिवशी किती केली कमाई?

बॉक्स ऑफिसवर 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाने भारतात फक्त २५ लाख रुपयांची कमाई केली. शुक्रवारी एकूण ७.४४ टक्के हिंदी ऑक्युपेन्सी होती. अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेल्या 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाने त्याच्या शेवटच्या 'घूमर' (२०२३) चित्रपटापेक्षाही कमी कमाई केली आहे. जगभरात चित्रपटाने ८५ लाख रुपयांची कमाई केली आहे.

काय आहे कथा?

'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटात अभिषेक अर्जुनची भूमिका साकारत आहे. या अर्जुनचे आपल्या मुलीशी गुंतागुंतीचे नाते संबंध आहेत. जीवनाचे १०० दिवस शिल्लक असताना तो ते बदलण्याचा प्रयत्न करतो. आता त्याला या सगळ्यामध्ये यश मिळते की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागणार आहे. 'आय वॉन्ट टू टॉक'मध्ये अभिषेकसोबत जॉनी लिव्हर, अहिल्या बामरू, बनिता संधू आणि पर्ल माने यांच्याही भूमिका आहेत.
I Want To Talk review: अभिषेक बच्चनचा 'आय वॉन्ट टू टॉक' सिनेमा कसा आहे? वाचा रिव्ह्यू

नुकतेच पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अर्जुनच्या भूमिकेसाठी वजन वाढवण्याबाबत अभिषेकने खुलासा केला होता. "पोस्टरमध्ये तुम्हाला जे दिसतंय तेच तुम्हाला पाहायला मिळेल मी वचन देतो. मी आता या अवस्थेत नाही. तो मी आहे आणि कुठलाही प्रोस्थेटिक मेकअप नाही. पुन्हा कधीही चित्रपटासाठी वजन वाढवू नका. माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या वयात काही काळानंतर ते कमी करणे खूप कठीण होते" असे अभिषेक म्हणाला.

Whats_app_banner