मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘मला हिंदूंची भीती वाटते कारण हिंदूच हिंदुत्त्वाच्या विरोधात’; शरद पोंक्षे यांच्या फेसबुक पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष

‘मला हिंदूंची भीती वाटते कारण हिंदूच हिंदुत्त्वाच्या विरोधात’; शरद पोंक्षे यांच्या फेसबुक पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष

Jun 05, 2024 10:52 AM IST

शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये निवडणुकीचा उल्लेख केलेला नाही. पण, ही पोस्ट वाचताच अनेकांनी ती निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर असल्याचं म्हटलं आहे.

शरद पोंक्षे यांच्या फेसबुक पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष
शरद पोंक्षे यांच्या फेसबुक पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष

नुकताच लोकसभा निवडणूक २०२४चा निकाल नुकताच समोर आला. यानंतर या निकालामुळे अनेकांना धक्का बसला आहे. मतमोजणीनंतर विजयी झालेल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राजकीय नेतेच नव्हे, तर मनोरंजनसृष्टीतील कलाकार देखील यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते शरद पक्ष यांनीही त्यांच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर शरद पोंक्षे यांनी मोजक्याच शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये निवडणुकीचा उल्लेख केलेला नाही. पण, ही पोस्ट वाचताच अनेकांनी ती निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर असल्याचं म्हटलं आहे. तसेच, यावर कमेंट करताना देखील निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर केल्या गेल्या आहेत. शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वक्तव्य लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वाक्य पुन्हा खरं ठरलं. मला मुस्लिमांची, ख्रिश्चनांची भीती वाटत नाही. मला हिंदूंची भीती वाटते कारण हिंदूच हिंदुत्वाच्या विरोधात उभे ठाकतात.’ शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर येतात व्हायरल झाली आहे. अनेक नेटकरी या पोस्टवर कमेंट्स करताना दिसत आहेत. कमेंटच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी देखील आपापली मतं व्यक्त केली आहेत.

३६ वर्षांपासून मनोरंजन विश्वातून गायब आहे ‘महाभारत’ची ‘कुंती’; चित्रपटात बिकिनी घालून दिलेले बोल्ड सीन!

काय म्हणाले नेटकरी?

यावर कमेंट करत एकाने लिहिले की, ‘होय अगदी खरं आहे...शोकांतिका आहे... आपल्याला इतकं वाईट वाटत आहे तर मोदी आणि प्रभृतीना किती वाईट वाटलं असेल कल्पना करवत नाही..आपल्या लोकांना नेमकं हवंय तरी काय तेच कळत नाही.. पैसा, मोठेपणा, प्रतिष्ठा, सत्ता, खूप खायला, खूप आराम करायला काय हवंय तरी काय? काय या असल्या दुसऱ्यांना मतं देणाऱ्या लोचट लोकांना हवं तरी काय आहे? काय केलं त्यांच्यासाठी म्हणजे मोदी प्रभृतींची महत्ता कळणार आहे आणि लोक डोळस होणार आहेत? की त्यांचं खूप काहीतरी वाईट झाल्याशिवाय ते कळणार नाहीये?’ अशाच प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्रातील निकाल धक्कादायक!

महाराष्ट्रातला निवडणुकीचा निकाल अतिशय धक्कादायक आहे. अनेक दिग्गज नेत्यांना विजयाची अपेक्षा असताना त्यांना जोरदार धक्का बसला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला चांगलाच धोबीपछाड दिलाय. महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील तीस जागांवर बाजी मारली आहे. तर, महायुतीला अवघ्या १७ जागा मिळवता आल्या आहेत. काही ठिकाणी तर अपक्षांचा देखील विजय झालाय. सध्या महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे, त्याला जनतेने मतदानातून सडेतोड उत्तर दिल्याचं बोललं जात आहे. सर्वाधिक १३ जागा जिंकत काँग्रेस महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदा राज्यात काँग्रेसने दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४