प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शारदा यांचे पती बृजकिशोर सिन्हा यांचे निधन झाले होते. त्यानंतर शारदा यांना मोठा धक्का बसला. शारदा यांना बरेच दिवस दिल्लीमधील एम्स हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. शारदा यांचा मुलगा अंशुमनने व्हिडीओ शेअर करत आईच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. तसेच चाहत्यांना विनंती केली आहे की शारदा लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या म्हणून देवाकडे प्रार्थना करा.
शारदा यांचा मुलगा अंशुमनने त्यांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवर लाइव्ह जाऊन आईच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. 'यावेळी ही अगदी खरी बातमी आहे. आई वेंटिलेटरवर आहे. आताच मी कन्सेंट साईन केला आहे. आम्ही प्रार्थना करत आहोत. आई खूप मोठी लढाई लढत आहे. अतिशय खडतर असा प्रवास आहे. ती या सगळ्यातून बाहेर येऊ देत अशी प्रार्थना करा. ही खरी माहिती अपडेट आहे. मी आताच त्यांना भेटून आले आहे. छठी मां कृपा करो. डॉक्टरांना आताच भेटलो आणि त्यांनी सांगितले की अचानक केस बिघडली आहे. सर्वजण प्रयत्न करत आहेत' असे अंशुमन म्हणाला.
पुढे तो म्हणाला, 'मी यावेळी लाइव्ह येऊन तुम्हाला खरी माहिती देत आहे. कदाचित आईच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. आम्ही सर्वजण एकच प्रार्थना करत आहोत की आई या सगळ्यातून बरी होईन घरी यावी. त्यांचा जीव वाचवावा. तू खूप संघर्ष करत आहे. जे कोणी हे पाहात आहे आणि छठ पूजा करत आहे त्यांना मी विनंती करतो की पूजा-प्रार्थना करताना आईसाठी देखील प्रार्थना करा. बराच काळ तिने आपल्या देशासाठी आणि राज्यासाठी काम केले आहे. सध्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार.'
शारदा सिन्हा या एक भोजपूरी गायिका आहेत. त्यांनी छठ पर्व गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. बिहारमधील समस्तीपुर येथे १ ऑक्टोबर १९५२ रोजी शारदा यांचा जन्म झाला. म्यूझिकल कुटुंबात शारदा यांचा जन्म झाला. त्यांनी क्लासिकल संगीतात शिक्षण घेतले आहे. त्यांनी भोजपुरी आणि मैथिलीमध्ये अनेक गाणी गायली आहेत. १९८०मध्ये शारदा यांनी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनने आपल्या करिअरची सुरुवात केली. पण त्यांना छठ पर्वाची गाणी गाऊन खरी ओळख मिळाली.
वाचा: किरण गायकवाड आणि भाग्यश्री मोटे पहिल्यांदा एकत्र, 'या' हॉरर कॉमेडी सिनेमात करणार काम
शारदा यांनी बॉलिवूडमध्ये देखील गाणी गायली आहेत. त्यांना सलमान खानच्या मैंने प्यार किया चित्रपटातील कहे तो से सजना हे गाणे गायले. त्यानंतर सलमान आणि माधुरी दीक्षितच्या हम आपके है कौन मधील बाबुल , अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपुर २ मधील तार बिजली से पतले आणि इतर काही गाणी गायली आहेत. १९९२ साली शारदा यांना पद्मश्री आणि २०१८मध्ये पद्म विभूषण आणि २००६ मध्ये पद्म भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.