"चांदनी बार", "ट्रैफिक सिग्नल", "फॅशन", "पेज ३" , "बबली बाउन्सर", "इंडिया लॉकडाऊन" अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर सर्किट या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात हृता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील आता अकॅशनचा भरणा असणारे गाणे प्रदर्शित झाले आहे.
हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या 'सर्किट' या चित्रपटातलं "वाजवायची सानकन ' हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. रॅप शैलीचं हे गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी गायलं असून मंगेश कांगणे यांनी हे गाणे लिहिले आहे. या गाण्यात वैभव तत्ववादी एकदम हटके अंदाजात दिसत आहे. आता त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
काही दिवसांपूर्वी सर्किट या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता अधिकच वाढलीय. येत्या ७ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. आतापर्यंत टीझरमध्ये वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी यांची भूमिका आपल्याला पहायला मिळाली होती आणि आता ट्रेलरमध्ये अभिनेते मिलिंद शिंदे यांची दमदार एंट्री झाली आहे.