बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तो सबा आझादला डेट करत आहे. अनेकदा पार्ट्यांना, कुटुंबीयांसोबत ते दोघे एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. आता ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सबाच्या एका फोटोवर हृतिकची एक्स वाइफ सुजान खानने कमेंट केली आहे.
सबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती उन्हात बसली असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत साबाने 'सहज दुपारी बसलेली असताना काढलेला फोटो' असे कॅप्शन दिले आहे. तसेच हा फोटो हृतिक रोशनने काढल्याचे देखील तिने म्हटले आहे.
वाचा: दीपिका पादूकोणने चाहत्यांना दिली गूडन्यूज, ‘ऑस्कर’शी आहे कनेक्शन
हृतिकची एक्सवाईफ सुजानने या फोटोवर कमेंट केली आहे. तिने, 'सुंदर मुलगी' अशी कमेंट केली आहे. तिच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. इतर यूजर्सने देखील काही कमेंट केल्या आहेत. नेटकऱ्यांनी तर सबाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
हृतिकने २००० साली सुझेन खान सोबत लग्न केलं होतं. मात्र, २०१४ साली त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हृतिक गेल्या काही महिन्यांपासून सबाला डेट करत आहे. सबा देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. एअरपोर्ट असो किंवा आउटिंग सबा आणि ह्रतिक सगळीकडे एकत्र जाताना दिसतात. तर, ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
संबंधित बातम्या