मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Fighter Movie Review: आसमानी मोहब्बत! कसा आहे दीपिका आणि हृतिकचा 'फायटर?', वाचा रिव्ह्यू

Fighter Movie Review: आसमानी मोहब्बत! कसा आहे दीपिका आणि हृतिकचा 'फायटर?', वाचा रिव्ह्यू

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 25, 2024 03:08 PM IST

Hritik Roshan Fighter movie review: 'फायटर' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता चित्रपटात काय कथा दाखवण्यात आली आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Fighter Movie Review
Fighter Movie Review

आजकाल बॉलिवूड चित्रपटांमध्ये अॅक्शन सीन्स, पाकिस्तानी खलनायक, चित्रपटातील हिरो भारतीय सैन्यात आणि त्याचे काही कटू अनुभव, एक-दोन देशभक्तीपर गीते हे सरास पाहायला मिळते. तसेच अॅक्शन चित्रपट हे देशभरात तुफान कमाई करताना दिसतात. मात्र, 'फायटर' या चित्रपट अॅक्शन सीन्स दिसत असले तरी कथा ही भारतीय वायुसेनेशी जोडलेली आहे. जर भारतीय वायू सेनेच्या युवकांनी मनात आणले तर आजूबाजूच्या प्रांतातील एकही जण भारताकडे डोळे वर करुन पाहण्याची हिंमत करणार नाहीत. 'फायटर' या चित्रपटाची तुलना हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजच्या 'टॉप गन' आणि 'टॉप गन मेरेविक'शी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'फायटर' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. आज २५ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन, अभिनेत्री दीपिका पादूकोण, अनिल कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता या चित्रपटात नेमकी काय कथा दखावण्यात आली आहे? चला जाणून घेऊया...
वाचा: 'आम्हाला लाजवू नका', अफेअरच्या चर्चांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया

'फायटर' चित्रपटात शमशेर पठानियाची कथा दाखवण्यात आली आहे. ही कथा जम्मू, हैदराबाद आणि लखनऊमध्ये फिरताना दिसते. शमशेरला वायू सेनेतील सर्वजण पॅटी या नावाने आवाज देतात तर घरी शम्मी म्हटले जाते. पॅटीचा सीईओ ज्या गोष्टी मान्य करतो त्याला त्याचा विरोध असतो. त्यामुळे काहीश्या प्रमाणात पॅटी हा दुखावला गेला आहे. वायू सैन्यात एक नवीन अॅक्शन टीम तयार होत असते. मीनल राठोर त्याचा एक भाग असते. पहिल्याच भेटीत ती पॅटीवर फिदा होते. दोघांमध्ये हळूहळू जवळीक निर्माण होत असते. तेवढ्यात पॅटीला पुन्हा एअरफोर्स अकदामीमध्ये पाठवण्यात येते. इकडे एका ऑपरेशनसाठी जम्मूची टीम तयार असते. तर तिकडे पॅटी नोकरी सोडण्याच्या बेतात असतो. पण युद्धात नियम, कायदे महत्त्वाचे नसून जिंकण्याला महत्त्व आहे. चित्रपटातील 'जंग में सिर्फ हार या जीत होती है, कोई मॅन ऑफ द मॅच नही होता' हा डायलॉग हिट होताना दिसत आहे. आता पॅटी नोकरी सोडतो का? जम्मूमधील त्याचे ऑपरेशन यशस्वी होते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागणार आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा आठवा चित्रपट आहे. व्हिजुअल इफेक्ट्स, कंप्यूटर ग्राफिक्स इमेजिंगमध्ये मास्टर आहे. हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांचा अभिनय पाहण्यासारखा आहे. त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच वायू सेनेने प्रदर्शित केलेले हवाई प्रयोग हे अंगावर शहारे आणणारे आहेत. एकंदरीच चित्रपट चांगला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

WhatsApp channel